प्रस्तावना
असा हा आमचा आदर्श समूह.
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह
"आम्ही सावित्रीच्या लेकी"
"ज्ञान मान-सन्मान."
महाराष्ट्रातील "सावित्रीच्या लेकींना" तंत्रज्ञान शिकवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाची निर्मिती करण्यात आली.
जुन्नर मधील माझ्या भगिनी सौ.सुनीता औटी यांच्या मदतीने प्रथम "राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका" समूहाची निर्मिती करण्यात आली. या वेळी मला माझे मार्गदर्शक मित्र मा. शिवाजीराव नाईकवाडे साहेब विस्तार अधिकारी नांदेड व केंद्र प्रमुख मा. साहेबराव शिंदे साहेब जुन्नर यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले .
"ज्ञान -मान-सन्मान " या ब्रीद नुसार समूहाचे कार्य सुरू झाले. सर्वात प्रथम कॉपी-पेस्ट बंद करून ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळा स्व-निर्मितीला प्राधान्य देण्यात आले . प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अनेक उपक्रम ,
शाळा विद्यार्थी व शिक्षक यांना उपयुक्त उपक्रम , माझी शाळा - माझे उपक्रम ,विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . समूहाच्या कार्याचा प्रसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत गेला. व समूहांमध्ये अनेक शिक्षिका सामील होऊ लागल्या. अल्पावधीतच या समूहाचे १५ समुह तयार झाले व महाराष्ट्रातील हजारो भगिनी या समूहांमध्ये सहभागी झाल्या. या समूहांच्या जडणघडणीसाठी व समूहाच्या कार्यासाठी मला सौ. सुनीता औटी -जुन्नर, करुणा गावंडे चंद्रपूर .भारती कुंभार रायगड ,सुनीता जाधव रत्नागिरी ,सुरेखा ठाकरे यवतमाळ, कविता देशमाने लातूर, विजया वाघ नाशिक , अलका धाडे बुलढाणा, प्रमिला सेनकुडे नांदेड ,हेमा देशमुख रायगड, अपर्णा ढोरे अकोला ,अनुराधा जेवळीकर उस्मानाबाद, सुवर्णा ढोबळे जुन्नर वृंदा धामणस्कर पनवेल, वृषाली खाड्ये मुंबई, वर्षा देशमुख औरंगाबाद, अलका धनकर , नजमा शेख - बीड, सुषमा सांगळे -वनवे सिंधुदुर्ग , सोनाली साळुंके जळगाव , प्रतिमा शिंदे, रेखा शिंदे, आशा पाटील, प्रतिभा पगारे , स्वाती गवई , स्वाती शिंदे ,कविता पुदाले ,प्रीती रामटेके ,सुनीता पवार, वंदना अलमद, राणी जगदाळे , मनीषा लोमटे , मीनाक्षी नागराळे वंदना पाटील मनिषा अपसिंगेकर ,शिवकन्या पटवे, बीना उकीरडे , नीलिमा यादव, चित्ररेखा जाधव, स्मिता नवघरे ,अर्चना वैद्य , वैशाली भामरे ,शुभांगी तुप्तेवार, वैशाली बाजारे, प्रज्ञा जाधव, मनिषा पवनार यांनी प्रशासक म्हणून मोलाचे सहकार्य केले व साथ दिली.
आमच्या समुहाची खरी वाटचाल सुरू झाली ती Only active शिक्षिका समूहापासून. ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळांचे आयोजन चालू झाले. गुगल सर्चचा वापर करणे, उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती , स्वतःच्या आवाजात गाणी - कविता रेकॉर्ड करणे व इफेक्ट देणे ,online test ,शैक्षणिक साहित्य निर्मिती, माझी शाळा माझे उपक्रम ,अनेक उपयोगी अॅपची माहिती व वापर, blend collage पासून शैक्षणिक साहित्य शुभेच्छा संदेश तयार करणे , gif निर्मिती ,online माहिती भरणे , pdf - ppt तयार करणे, youtube Chanelतयार करणे व त्यावर व्हिडीओ अपलोड करणे .त्याची लिंक तयार करणे व शेअर करणे , गुगल ड्राईव्हचा वापर , फोटो एडिटिंग करणे , फोटो कोलाज करणे , शब्दांचे डोंगर ,शब्द पट्टया, वाक्यपट्टया, चित्रकाव्य, शब्द कोडी, सामान्य ज्ञान प्रश्नावली, विविध स्पर्धा ,चारोळी, काव्य,लेख तयार करणे अशा अनेक कार्यशाळा समुहात घेण्यात आल्या. त्यांचा सराव व गृहपाठ घेण्यात आला.
महिलांना घरबसल्या त्यांच्या वेळात तंत्रज्ञान कार्यशाळा घेऊन विविध अॅप , उपक्रम ,शैक्षणिक साहित्य निर्मिती व तंत्रज्ञान शिकवण्याचं काम या समुहाने केले आहे. या समुहामुळे अनेक तंत्रस्नेही मास्टर ट्रेनर शिक्षिका तयार झाल्या आहेत.
समुहामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून सर्व सहभागी व विजयी स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रक वितरण सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दि .५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी समुहामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिकांना मा. भराडे मॅडम यांचे हस्ते "आम्ही सावित्रीच्या लेकी " या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ,
आमचे तंत्रस्नेही मित्र माननीय मधुकर माळी सर सोलापूर यांनी शाळा ॲप तयार केले. त्या शाळा ॲपचे ऑनलाईन उद्घाटन समूहाच्या प्रशासिका करुणा गावंडे यांच्या नेतृत्वाखाली Only Active Team ने केले.
राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध व देखणा कार्यक्रम झाला . त्या सर्व टीमचे राज्यभरात कौतुक झाले. मला सुध्दा माझ्या Active Team चा अभिमान आहे.
या समूहाने अनेक ऑनलाइन समारंभ आयोजित केले असून त्यात अनेक मान्यवर अधिकारी व तंत्रस्नेही मित्रांना निमंत्रित केले आहे .ऑनलाइन कार्यक्रम कसा असावा व समुहाची शिस्तबद्धता कशी असावी याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
या समुहाचा विस्तार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये झाला असून या समुहामध्ये उच्चशिक्षित शिक्षिका ,नामांकित लेखिका , कवयित्री, साहित्यिक असून अनेक आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला भगिनी या समूहात सहभागी आहे .या समूहाने अनेक उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणून तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण . स्व अभिव्यक्तीसाठी एक राज्यस्तरीय मुक्त व्यासपीठ निर्माण केले आहे.
या समुहामध्ये काम करत असताना मला वेळोवेळी महाराष्ट्रातील अनेक तंत्रस्नेही मित्रांनी व भगिनी सहकार्य केले. समुहामध्ये कार्यशाळा घेतल्या .समूहाच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले ते सर्व सदस्य ,सर्व प्रशासक, त्यांचे सर्व कुटुंबीय व माझा स्वतःचा परिवार यांचा मी ऋणी राहील .
या समूहाच्या माध्यमातून मला अनेक ज्ञानवंत व गुणवंत भगिनी मिळाल्या . ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या समुहाचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले व मला आपला लहान भाऊ म्हणून मानसन्मान दिला .समूहाच्या कार्यात अनमोल सहकार्य केले ,त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.
समूहाचे काम करत असताना माझ्याकडून व माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रशासकांकडून कुणाचे मन दुखावले असल्यास आपण दिलदार मनाने आम्हास माफ कराल ही अपेक्षा .
पुनश्च एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार.
समुह प्रमुख.
सुदाम साळुंके सर.