सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया ४


समुह क्र- ४ प्रतिक्रिया
सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया
( संकलन - सुदाम साळुंके सर )
माधवी ताई:
ताई, दादा खरंच तुमचे कौतुक करावे तितके कमीच. तुमचे लाख लाख आभार. 🙏🏻सामूहिक महाकाव्य हा उपक्रम एक नवीन अनुभव देऊन गेला.दोन दिवस डोक्यात काव्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. काम करताना सुद्धा काव्य रचनाच सुरू होती.एका वेगळ्याच विश्वात होते मी दोन दिवस. मी सुद्धा कविता करू शकते हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला.दादा,ताई तुमचे प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहेत. असेच प्रोत्साहन देत रहा आम्ही प्रयत्न करत राहू.
एकदा पुन्हा लाख लाख धन्यवाद!!!
महादेवी फुलसूरे
ता केज जि. बीड शिक्षिका
[03/05, 8:31 AM] ‪
+91 94218 46288‬:
साळुंके सर आपण खूप स्तुत्य असा उपक्रम राबवीला
कवी मनावर  एक प्रकारची धूळ चढलेली होती ती झटकुन नवी कविता करण्यास या उपक्रमामुळे नवचैतन्य मीळाले . सर्वांना महाराष्ट्राच्या  संस्कृती बद्दल व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून दिलीत त्या बद्दल आपले शत : धन्यवाद
अजून एका नवीन उपक्रमाच्या प्रतीक्षेत .
सौ . प्रभा भोयर  केंद्र प्रमुख यवत
[03/05, 9:16 AM] ‪
+91 94228 54116‬:
कविता ही केवळ शब्दांची  गुंफन नव्हे,,,, तिला आधार असतो अगणित भावनांचा,,,,,, विचार मंथनातून जन्माला आलेले काव्य हे एक रत्नच। महाराष्ट्रातून अनेक कारागिरांनी दोन दिवसांपासून अशा असंख्य रत्नांनी या माय भू ला अगदी मढवून टाकले. मराठी संस्कृती, मराठी पराक्रमाची थोरवी गाइली. सर्वांना एकत्र घेऊन आपण हा उपक्रम राबवला, तो खरचं खूप कौतुकास्पद आहे. असेच नवोपक्रम पुढे ही आयोजित करावे या साठी शुभेच्छा। आम्हा सर्वांना संधी दिल्याबद्दल आभार। 🙏🙏🙏
श्रीमती शितल संजय गायकवाड. (शिक्षिका)
मु.  वडगाव.पो.बिबी,
ता. फलटण, जि. सातारा.
9422854116.
[03/05, 9:46 AM]
सुदाम साळुंके सर:
एक अभिनव उपक्रम आहे हा.  अनुकरणीय,  आदर्शवादी उपक्रम  असून काव्य कलेचा व्यासंग वाढविणारा व काव्य जगतात, रेकॉर्ड ब्रेक करणारा  एक अभिनव उपक्रम आहे हा.  अनुकरणीय,  आदर्शवादी उपक्रम  आपण यशस्वी रित्या राबविला.  काव्य कलेचा व्यासंग वाढविणारा  व उत्स्फूर्ततेला प्रोत्साहन देणारा हा ऑनलाइन सोहळा  आपण आयोजित केला. सुदाम साळुंखे सर व त्यांचे सर्व सहकारी,आपले मनापासून  अभिनंदन.. . !
कविता नव्हे, ही तर संधी
या ह्रदयीचा , प्रवास छंदी .
अशाच आपल्या प्रत्येक अभिनव उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. !
समस्त कविंचे लक्ष वेधून घेणारा काव्य लेखन सोहळा अपार मेहनत घेऊन, सर्व सहकार्यासमवेत आपण यशस्वी रित्या संपन्न केलात.
अभिनंदन.  ..!
आपल्या कार्यप्रवणतेचे हे यश आहे.
हा ग्रुप कृपया बंद करू नये. वेगळया नावाने चालवावा. संपूर्ण देशातील कवी या निमित्ताने एकत्र आले. संवाद  असाच चालू राहिल्यास काव्य कलेचा व्यासंग वाढेल.
कविराज विजय यशवंत सातपुते.
यशश्री 100 बाहेर दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर  नंबर 2. पुणे 9
मोबाईल  :- 9371319798.
[03/05, 9:56 AM]
मीनाक्षी नागराळे (साळुंके ) वाशिम: उपक्रम चांगला हाती घेतला
सहकार्य लाभले मान्यवरांचे..
कौतुक करण्या शब्द अपुरे ..
धन्यवाद मानते प्रत्येकांचे...
सर्व कवी झाले गोळा...
आनंदाचा हा अपुर्व सोहळा..
चालू लागल्या लेखण्या भरभर
आणि काव्य झाले सुरू...
प्रत्येकाची प्रतिभा वेगळी
शब्दांचे मोती झाले एकत्र
सर्वाच्या सहकार्याने काव्याचे
झाले महाराष्ट्रात महाकाव्य पवित्र.....
मिनाक्षी नागराळे,वाशिम
👌👌👌🌹🌹🌹🙏
[03/05, 10:39 AM] ‪
+91 86985 92054‬:
बरेच दिवसांनी लेखण केले.आणि    परत आत्मविश्वास निर्माण झाला ,सर्वसमूहाचे आभार,आणि धन्यवाद
अर्चना शहाकार,शिक्षिका
8698592054
[03/05, 10:44 AM] ‪
+91 86259 04067‬:
खुपच छान उपक्रम होता. अप्रतिम आपण आतापर्यंत निबंध काल्पनिक निबंध असे लेखन नेहमी करतो पण काव्याच्या चारोळी ओळी करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला समूह प्रमुख सर्व समुह प्रशासक समिती यांचे मनापासून आभार
भारती महाजन जि.जळगाव
[03/05, 10:51 AM]
माधुरी जोशी बुलढाणा:
उपक्रम अतिशय सुरेख
ज्यात नाही कोणतीही मेख
संधी मिळाली प्रत्येकाला
मुक्तपणे अभिव्यक्त होण्याला
वैभव महाराष्ट्राचं
लेखणीतून उतरवायचं
विविधांगी विषयातून
महाकाव्य  निर्मायचं
सुदामदांनी घातली साद
भरभरून मिळाला प्रतिसाद
मलाही येतं लिहीता
वाढला आत्मविश्वास
अभिव्यक्त होण्यासाठी
नवनवीन उपक्रमांची आहे आस
सर्जनशील उपक्रमांसाठी
ही सदिच्छांची ओंजळ खास
सौ. माधुरी जोशी  जि. बुलडाणा
[03/05, 11:27 AM]
+91 97656 45837‬:
समूह लय भारी
महाकाव्य उपक्रम त्याहून भारी
कवीना घडली काव्याची वारी
माझ्या महाराष्ट्राची शानच न्यारी
आयोजकाचे आम्ही आभारी
---सौ.एम.बी.नेमाने
9765645837
[03/05, 11:42 AM] ‪
+91 96379 59257‬:
स्तुत्य उपक्रम !
वैचारिक खाद्य देणारा
आंतरिक भावना व्यक्त करणारा
अस्मिता जागृत करणारा.
सौ.मेघा पाटील. पालघर
[03/05, 11:54 AM] ‪
+91 98908 27867‬:
खूप दिवसानंतर लेखन करण्याचा योग यानिमित्ताने आला, सर्वच सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे एक काव्यलेखनाचे वैशिष्ट्य होते,हे सर्व घडवून आणणारे master mind साळुंखे सरांचे, साधारणतः चारोळी दिसायला दिसते चार ओळींची पण त्यामध्ये किती किती सुंदर चारोळ्या अंतर्मुख करायला लावणाऱ्या, खूपच सुंदर, आपापल्या कल्पकतेने प्रत्येकाने महाराष्ट्राचे गुणगान केले, थोड्याच वेळात संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यांसमोर होता,या महाकाव्याचे आम्ही साक्षीदार म्हणून सार्थ अभिमान, धन्यवाद दादा,ताई आपणा सर्वांचे खूप  खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻                   सोनाली ठोकडे,सोलापूर
[03/05, 12:10 PM] ‪+91 82752 97996‬:
भावनांची सुरुवात आणि भावनांचा आदर जिथे झाला...
ते म्हणजे
             महाकाव्य....ग्रुप. ....
आणि  म्हणुनच .....
             म्हणावसं वाटतं.....
अनदेखा अनसुना उपक्रम पाहुन
                मन माझे मोहरुन गेले
सुदाम दादांच्या नियोजनाने
                कवि सारे बहरून गेले
चार ओळीची चाहुल लागली
           संदेश दिला करुणाताईंनी
चार ओळी त्या येऊ लागल्या
            मनात होती जी रंगवलेली
आज अचानक लिहु लागली
           ह्दयाची स्पंदने वाढलेली
प्रत्येकाच्या ओळी पाहण्याकरिता
         नेत्र सर्वाचे अतुर झालेली
ओळीचे ते महाकाव्य झाले
     अनुराधा ताईंनी सुचित केले
अपर्णा, हेमा,रेखा या सर्वाचे
सौख्य आम्हास लाभले...
सुमनांजली गेणुजी बनसोडे (प्रा.पदवीधर)
शिवाजी नगर शिक्षक काॅलनी
पोस्ट.  पाचोड
ता पैठण.जि.औरंगाबाद
8275297996
[03/05, 12:34 PM]
कमल पडघन:
समूह प्रमुख श्री सुदाम दादा,समूह प्रशासक ताई तसेच समूह प्रशासक समिती ,आपणा सर्वांच्या मेहनतीने हा सामूहिकमहाकाव्य ग्रुप तयार झाला व सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला यानिमित्ताने मी सुद्धा चार ओळी लिहू शकते असा आत्मविश्वास स्वतः मध्ये निर्माण झाला .दादा व सर्व ताई आपले कौतुक करण्यास तर शब्द हि अपुरे पडतात .आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
कविता हि कविता असते,
कवीच्या हृदयातील शब्दांची
गुंफण असते.
लेखणीद्वारे कागदावर उमटते वाचणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते.
पुनःश्च सर्वांचे आभार
कमल पडघन अमरावती
[03/05, 2:24 PM] ‪
+91 98507 91903‬:
राज्यस्तर उपक्रम शिक्षीका समूह .. सामूहिक महाकाव्य-आपल्या कार्यप्रवणतेच्या यशास माझा मानाचा मुजरा 🎺 ✌🏻
मैंने एक बार पढा था-जो लोग दुसरोंको पढ़ते और समझते है वों बुद्धीमान होते है लेकिन जो खुदको पढ़ते और समझते है वों प्रबुद्ध होते है ! (क्या कर सकते है और आपने कर दिखाया) 
शब्दात सांगू कशा भावना
स्तुत्य उपक्रम महाकाव्यरचना
58 व्या महाराष्ट्र दिना
अदभुत अनुभूती कवीजना
तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
सामूहिक रचनेचा काव्यसागर
सुवर्णक्षणांत मी भागीदार
आयोजकांचे हृदयपूर्वक आभार !!!
👌🏻🙏🏻💐💐💐
अलका सोनावणे पवार
शिवाजीनगर,श्रीरामपूर
ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर
मो.नं.-9850791903 ,9881791678
[03/05, 4:08 PM]
स्वाती गवई:
*सुदामदादा* जोड नाही तुमच्या कल्पकतेला
*महाकाव्य* हा केले महाराष्ट्रदिन १मे ला...
नवनविन कल्पना आणता तुम्ही सत्यात
अनेकवीध यश मिळो तुमच्या भत्त्यात...
महाकाव्य असे हे महाराष्ट्राचे
गुंफले भाव सर्व संस्कृतीचे ...
शब्दन्शब्द स्तुती महाराष्ट्राची
छाती अभिमानाने फुले सर्वांची...
दिली संधी आम्हा लिखाणाची
महाराष्ट्रा वंदन करण्याची...
माळ स्फुरली शब्दांची अन्
झाली गुंफण महाकाव्याची...
स्वाती सुमन-भगवान गवई(शिक्षिका),औरंगाबाद.
[03/05, 4:16 PM]
सौ. राजश्री पल्लेवाड उपसंपादक:
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय सुदाम सरजी,करूणा मॅम,मधुकर सरजी.
आपण करत असलेल कार्य अप्रतिम आहे.आपण  सर्वांना तंत्रस्नेही करण्यासाठी धडपडत आहात.आपणास
त्यात यश येत आहेच.असेच अनेक रेकाॅर्ड
होतील यात शंका नाही.
*आपल्या कार्याला सलाम व आभाळभर शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ राजश्री रामराव पल्लेवाड
उपसंपादक
जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य
[03/05, 4:19 PM]
+91 97646 48219‬:
58व्या महाराष्ट्र दिनी , अतिथीजनांच्या पदस्पर्शानी ,भव्यदिव्य हा महाकीव्य सोहळा ,न्हाऊन गेला आमं्
आम्हा सर्वांच्या प्रतिसादानी , काव्याच्या रूपात केला तुम्ही आमचा आदर ,म्हणुन मी आपणा सर्वांचा मानिते आभार ,आभार ,आभार.
[03/05, 4:35 PM] ‪
+91 94226 03967‬:
*कशी होऊ उतराई*
राज्यउपक्रमशील शिक्षीका समुहातून
साकार झाला काव्य / चारोळी समुह
वेगवेगळ्या कवयित्रींनी
लावली त्याला काव्याची झालर
याची व्याप्ती वाढवली
११ मार्च २०१८ च्या तंत्रस्नेही महिला संमेलनाने
याचेच भव्यदिव्य रूप पहायला मिळाले
१ नाही ,२ नाही , ३ नाही तर चक्क ४  *सामुहिक महाकाव्य समुहाच्या* रूपाने.
ताई आणि दादांनी मिळून सुरू केलेल्या आगळ्या - वेगळ्या आणि अप्रतिम अशा  उपक्रमाचे *कौतुक* करावे तेवढे कमीच आहे
    असा हा अनोखा उपक्रम साकार करून त्यात आमच्या सारख्या
*कविता कशी करतात?
हे ही माहित नसणा-यांना प्रेरणा देऊन   ताईंनी अन् दादांनी *काव्य / चारोळी* यासमुहाच्या माध्यमातून *लिहीते व्हा* असा दिलासा दिला . मग काय लेखणीच्या माध्यमातून  मनातील भावना साकार होऊ लागल्या .
       त्याचेच उत्तम उदा. म्हणजे आज कितीतरी *महाराष्ट्राची संस्कृती* सांगणारी काव्य उदयास आली.
    खरोखरच अतिशय   *अप्रतिम*, *अनोखा* , *भव्यदिव्य* , *स्थुत्य* असा हा उपक्रम
  यामध्ये मला सामावून घेतले . खूप धन्यवाद .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुरेखा इंगळे ( सहशिक्षीका )
*सरस्वती प्रा. विद्यामंदिर  - बीड*
[03/05, 4:40 PM]
Kurhade Madam Junnar:
५९ व्या महाराष्ट्रदिनी सुदामदादा व करुणाताई व सर्व सहप्रशासक समितीच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून सामूहिक महाकाव्य निर्मिती हा अतिशय अभिनव उपक्रम राबविण्यात आला.कविता करणे हे अतिशय अवघड वाटायचे मला पण राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह जॉईन केल्यापासून माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मी प्रयत्न केला व  ग्रुपमधील उपक्रमांतर्गत व चारोळ्या लिहू लागले. त्यामुळेच मी सामूहिक महाकाव्य समूह जॉईन केला.
   या समूहात चारोळ्या लिहिताना          मनातल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयच्या भावना हातातून कागदावर उमटल्या आणि हि संधी मिळाली ह्या समूहाच्या माध्यमातून.
    अतिशय अभिनव व सुंदर उपक्रम.त्यामुळे सुदामदादा,  करुणाताई व सर्व सहप्रशासक ताईंना खूप खूप धन्यवाद.
   मनिषा  कुऱ्हाडे  (शिक्षिका) पुणे
[03/05, 5:50 PM]
प्रज्ञा जाधव औरगाबाद:
नमस्कार,
      आदरणीय दादा व ताई तुमच्या कल्पनेने महाराष्ट्र दिनानिमित्त सामुहिक महाकाव्य निर्मिती घेण्यात आली व विषय जिव्हाळ्याचा होताच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती.
     महाकाव्याचे आयोजन करताच जवळ जवळ चार ग्रुप फुल झाले. या महाकाव्याचे वैशिष्टय असे होते की वेळेवरच   
काव्य निर्मिती करायची होती . या काव्यानिमिर्तीत अनेक नव नवीन कवी व कवयित्रीच्या काव्याचा आम्हाला  आस्वाद व आनंद घेता आला.
   अतिशय नाविण्यपूर्ण  महाकाव्यनिर्मिती उपक्रम खूपच आगळावेगळा व वैशिष्टयपूर्ण ठरला .
प्रज्ञा विनायकराव जाधव ( शिक्षिका ) औरंगाबाद.
[03/05, 6:07 PM] ‪
+91 99226 83653‬:
महाकाव्य निर्मिती करण्यासाठी दादा व ताईंनी  खूपच बहुमोल संधी उपलब्ध करून दिली .त्यामुळे आमच्यातील सुप्त गुणाला वाव मिळाला.खूपच अप्रतिम उपक्रम. ग्रुप मध्ये नतनवीन शिकायला  मिळते.खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏
[03/05, 8:12 PM] ‪
+91 75071 01812‬:
महाकाव्यं निर्मीती चि  कल्पना अप्रतीम, सगळ्यांनाच खुप खुप शुभेच्छा !
[03/05, 8:50 PM]
+91 97651 02597‬:
खूप सुंदर महाकाव्याची कल्पना,वेगवेगळ्या विचारधार एका सुत्रात बांधल्या जाणार...रंगबिरंगी फुलांची एक माळ ओवली जाणार...विलक्षण.... कल्पनाच अप्रतिम
खूप खूप शुभेच्छा!!!!
[03/05, 9:47 PM]
डॉ. गुंफा कोकाटे बेलापूर:
मला महाकाव्याची कल्पना खूप आवडली .दादा व ताई आणि प्रशासक टिमच्या अथक परिश्रमातून हे महाराष्ट्र आँफ रेकाँर्ड मधे नोंन झाली,प्रशासक म्हणून काम करता आले,खूप मैत्रीणी लाभल्या,जीवाभावाच्या,आणि महाकाव्य अवतरले लेखणीतून...मजा आली ,,एक नवा अनुभव,एक नवा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहला गेला,प्रमाणपत्र याची साक्ष देत आहे दादा व ताई आम्हाला तंत्रस्नेही बनवतात ..आम्ही सर्व ताई उपकृत आहोत...महाकाव्याची निवड संकलन ..छान वाटले  ...महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे दर्शन झाले...

गुंफा कोकाटे-श्रीरामपूर
[03/05, 10:00 PM]
+91 73855 27355‬:
मी शाहीनसुल्ताना उर्दू शिक्षिका😊
मी उर्दू मधून कविता करत असते पण सुदाम सर व त्यांची टीम मूळे पहिल्यांदा मराठी भाषेतून काव्य केले वातावरण निर्मिती छान झाली होती।सर्वांच्या कविता वाचून माझी शब्द संपत्ती वाढली।
सर्वांची आभारी आहे।
[04/05, 4:11 PM]
+91 91564 65866‬:
आदरणीय श्री.सुदाम दादा🙏🏻खरंच खूपच छान उपक्रम होता.मी ज्ञानाने व अनुभवाने तुम्हा सर्वांन पेक्षा खूप लहान आहे. काव्य येत नाही तरीही या ग्रुपमध्ये आले व काहीतरी आपण ही करावे ही इच्छा .पण खूप चांगली चारोळी जमत नव्हती ,पण हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले मग का मागे राहावे ,असा विचार करून धाडस केले. पण खरं सांगायचं झालं तर श्री सुदाम सरांनी हिम्मत वाढवली व मलाही खारीचा वाटा मिळाला. ईश्वर चरणी प्रार्थना आहे माझी तुमच्या सारखे मार्गदर्शक,दिशा देणारे ,आदर्श व्यक्तीमत्व मला यापुढेही लाभावे. तुमच्या कार्याला व तुमच्या टिमला माझे त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
नुतन कासार (शिक्षिका),पुणे.

No comments:

Post a Comment