विशेषांक समीक्षण २

२ विशेषांक समिक्षण

1 मे 2020 विशेषांक
समिक्षण

महाराष्ट्र दिन विशेषांक समीक्षण दिनांक एक मे 2020 या दिवशी सुपर ऍक्टिव्ह शिक्षिका समूहाच्या वतीने पहिला महिला महाराष्ट्र दिन विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या विशेषांकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आणि सूचक आहे. शिवरायांचा महाराष्ट्र त्यात प्रगत महाराष्ट्राच्या प्रगतीची  ज्योत उजव्या कोपऱ्यात बोधचिन्ह मध्ये असणारी सावित्रीबाई यांची प्रतिमा. ज्ञान मान सन्मान यांचे प्रतीक. मुखपृष्ठ आकर्षक असल्याकारणाने विशेषांकाच्या आत काय असणार याची उत्सुकता लगेच जाणवते. संपादक श्री सुदाम दादा यांनी आपल्या संपादकीय मध्ये प्रत्येक उपक्रमशील शिक्षिकेचे लेख प्रकाशित करण्यासाठी केलेली धडपड जाणवते. तसेच त्यांनी मांडलेल्या मनोगतातून तंत्रस्नेही सुपर ॲक्टिव शिक्षकांची निर्मिती व्हावी व अजून उत्तम कार्य या समूहातून व्हावे हे जाणवते. समूहातील सर्व भगिनींचे ऋणनिर्देश केला आहे. डॉक्टर वैशाली झनकर, श्री पोपट काळे, श्री शिवाजी नाईकवाडे, श्री साहेबराव शिंदे व, श्री दिलीप ढेपले यांनी सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. यात विशेष अंकाला साजरासा महाराष्ट्र भूमी पोवाडा श्रीमती उषा ढेरे यांच्या लेखणीतून साकारला आहे. सद्यस्थितीवर भाष्य करणारा डॉक्टर गुंठा कोकाटे यांचा टाळेबंदी लेख अप्रतिमच. माहिती तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले संजीव जोशी यांनी. सुनिता इंगळे यांची पुस्तक कविता खरंच एखाद्या सुंदर पुस्तकासारखे छाप टाकते. श्री अनुज डुमणे यांची उपक्रम शाळा आणि त्यांनी राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत. पालकांनो मुलांना खेळू द्या हा लेखही पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. माझ्या आठवणीतील शाळा हा श्री साळुंखे सर यांचा लेख वाचून डोळ्यात टचकन पाणी येते. डिजिटल गॅलरी यामधूनही खूपच छान व ज्ञांनवर्धक माहिती मिळते. एकंदरीत पहिला महिला महाराष्ट्र दिन विशेषांक सर्व नव लेखिकेंना प्रेरणा देण्याचे काम करतो. व मीही लिहू शकते ही आशा प्रत्येकीच्या मनात  मूळ धरते. म्हणून जरी अंक थोडा मोठा झाला असला तरी सर्व वाचकांसाठी ती एक विलक्षण शिदोरी ठरेल यात शंका नाही. म्हणूनच प्रकाशक सर्वसममह प्रशासक यांचे विशेष आभार मानते की त्यांनी एक आगळीवेगळी भेट वाचकांना दिली.        जय महाराष्ट्र!                                      श्रीमती प्रतिभा राऊत.                        अहमदनगर.


Pratibha Patil Jalgaon:

काय वर्णू मी माझ्या समूहाची  गाथा. ....
ज्याने उंचावला,ओनली  सुपर अच्टिव महिलांचा माथा.....
काय  गाऊ मी विशेशांकची गाथा,शब्द अपुरे पडतील आता.
..विशेषाकचे बाह्यरुप .
मुखपृष्टावर थोर ..महापूरुषानचे दर्शन घडते.एक शिक्षक,शिक्षिका मिळुन  न्यानाची मशाल घेऊन जनू कोरोनाच्याअंधार युगावर मात करत पुढे चालत आहेत.
बाहेर सगळा शुक्षकट पसरला आहे.मात्र न्यानाची मशाल ही,कायम अशीच उजेळ देत रहाणार आहे....

विशेषकांचे अंतरंग

ड्रा.राधाकृष्ण .....
उत्कृष्ट शिक्षकांची व्याख्या करतात.
शिक्षकाने कमीत-कमी शिकून.
विद्यार्थी स्वतःअधिकाधिक शिकेल  यासाठी. त्याला. प्रशिक्षित. केले पाहिजे.
शिक्षकाने स्वतः शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे.
इतरांना शिकवणार्‍याने सतत शिकत राहयायला हवे .
त्याची शिकण्याची प्रक्रिया. कधी बंद पडू नये.
शिक्षकांनी आयुष्याच्या. अंतापर्यंत. विद्यार्थी म्हणून.
जगायला हवे.
प्रगतीच्या युगात तंत्रज्ञानाला स्थान.
ज्ञानाच्या विश्वात . मग मी शिक्षक असल्याचा आहे अभिमान.

उत्कृष्ट शिक्षण हे नेहमीच राष्ट्राच्या उभारणीत,महत्वाची भुमिका बजावत असते.

सज्ज होऊ करण्यास. देशाच्या महासत्तेचा विकास.
उज्वल भविष्य साकारण्यास. धरू तंत्रज्ञानाची कास.

हौसला बुल्ंद कर

रास्ते पे चल

तुझे तेरा मुकाम

मिल जायेगा

अकेला तु पहल कर दे

कफिला बनत्ता चला जायेगा....

सर्वस्वाची  जेथे प्रचिती, तेथे माझेकर जुळती.

मानवी जीवनात जीवन जगत असतांना ,आपले कर्तव्य जपुन
विविध मुल्य संस्कार,समाज,शाळा,काळाची गरज लक्षात घेता ,
देशावर कोरोनचे संकट असताना,एक शिक्षकच,भावी पिढीच
विचार करुन भावी राष्ट्र प्रभावशाली कसे टिकून राहिल,हया विशेषाकातुन पहवयास मिळाले.

घराचं घरपण जपताना.
घरात राहून आगळावेगळा महाराष्ट्र दिन.
विशेषांक.निर्मित. करणारया उपक्रमशील.

समूह प्रमुख.
सन्मनीय व्यासपीठ. याना मानाचा मुजरा.

आभार...
भाग्य मला लाभले हया समूहात सामील होण्याचे ,ठेवीन मी भान आपल्या कर्तव्याचे......

श्रीमती.प्रतिभा पाटील
 जळगाव
[5/17, 4:09 PM] +91 86006 76604: समीक्षण
सर्वप्रथम महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये  नोंद  झाल्याबद्दल  आपल्या सर्वांचे  अभिनंदन 💐.
सुरवात  करते  विशेषांकाच्या  मुख पृष्ठापासून सावित्रीबाई ची  प्रतिमा  जी या विशेषांकाबद्दल खूप  काही सांगून जाते.  महाराष्ट्राचे  आद्य  दैवत  छत्रपती शिवाजी  महाराज  यांची  प्रतिमा , हातातील  मशाल  खूपच  अप्रतिम  कल्पना. त्यासाठी  वापरले  रंग  फारच  विलोभनीय. आत  डोकावल्यावर  महाराष्ट्र दिन विशेष  - विषय  एकच  पण त्या  निमित्त केले  गेलेलं  लेखन  म्हणजे  एका  विषयाभोवती  गुंफलेले  निरनिराळे सुंदर  विचार. अप्रतिम 👍
[5/17, 4:17 PM] +91 94218 58326: महाराष्ट्र दिन विशेषांकाचे समिक्षण                               

          श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे श्री. सुदाम सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षिका ॲक्टिव तर सुपर ॲक्टिव शिक्षिका बनल्या.
          या विशेषांक  जेवढे कौतुक केले तेवढे थोडेच आहे. प्रत्येकांनी खूप सुंदर लिखाण केले. प्रत्येकांनी आपले गुणप्रदर्शन केले. भविष्य काळात विद्यार्थ्यांना कामात येईल असे लिखाण केले.
           सुदाम सरांचा एकच नारा सुपर,
           ॲक्टिव शिक्षिका केल्या साऱ्या.
           लॉकडाऊन मध्ये सुदाम सरांनी सोपा केलाउपाय,
           ओन्ली ॲक्टिव टीचर ग्रुप केला तयार.
                                    सी. ए. गोतमारे.
[5/17, 4:23 PM] +91 89751 46832: ***🎯 *राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह( ONLY SUPER ACTIVE* )🎯
≠======🙏🏻===========
एक मे 2020 महाराष्ट्र दिन विशेषांक.......
          प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विशेषांकाचे मुखपृष्ठ पाहिल्यानंतर लक्षात येते की या विशेषांकामध्ये  सर्व बाबींचा समावेश केला आहे .प्रत्येक सावित्रीच्या लेकीला त्यांच्या लेखनातून  प्रगट होण्याची संधी देणारे विशेषांकाचे सर्वेसर्वा श्री. सुदाम दादा व त्यांच्या या कार्यात मदत करणारा त्यांचा मुलगा सनी यांनी आपला अमूल्य वेळ राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका  समूह अधिक उपक्रमशील ऍक्टिव्ह करण्यासाठी व समूहा मधील प्रत्येकाला सक्रिय करण्यासाठी दिलेला आहे त्यांच्या योगदानामुळेच समूहातील प्रत्येक जण आज ऍक्टिव्ह झालेला व मुक्तपणे व्यक्त होत असलेला दिसून येत आहे या समूहातील सहभागीचां  उपयोग नक्कीच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी होईल.
          विशेषकॶंकामध्ये आपल्या लेखणीतून पोवाडा, कविता ,विविध लेख, फोटो गॅलरी, शुभ संदेश, रांगोळी, आकर्षक  चित्र, रेखाटन करून विशेषांक दर्जेदार करण्याचा प्रयत्न येथे केला आहे. विशेषांकाचे प्रत्येक पेज पाहत असता ,वाचन करत असता असे लक्षात येते की त्यामधून नितिमूल्यांची शिकवण दिली आहे .आपल्याला आपला  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी  लागणाऱ्या नितिमूल्यांची देण यामधून दिली आहे ‌.व प्रत्येकाच्या मनामध्ये सत्कार्य करण्याची उमेद निर्माण केली आहे.*.
        धन्यवाद !🙏🏻
=======🙏🏻===========
     श्रीम. वाघमारे व्ही.एल.
        प्राथमिक शिक्षिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंत नगर नळदुर्ग ता.तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.
----------------------------------------
[5/17, 4:27 PM] सीता टेकूलवार गडचिरोली: *समीक्षण*

  🖊️१मे महाराष्ट्र दिन विशेषांक

      १ मे महाराष्ट्र दिन विशेषांक म्हणजे महाराष्ट्रातील उपक्रमशील  व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाचा आ. साळुंके भाऊंनी  लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होय. ज्याची   फळे प्रत्येकालाच गोड लागत आहेत.
      १  मे महाराष्ट्र दिन विशेषांकाचा मुखपृष्ठावरच वैभवशाली महाराष्ट्राचे दर्शन घडते त्याबरोबरच आपल्या सुपर एक्टीव्ह समूहाचा लोगो हा या विशेषांकासाठी दिवसरात्र एक करून प्रयत्न केलेले आ. सुदाम भाऊ व आ. करूणाताई, वैशालीताई  व रेखाताई  यांच्यासह महाराष्ट्रातील सावित्रींच्या  लेकींनी पेटलेली ज्योत तेवतांना दिसते.
     संपादकीय पृष्ठावर या विशेषांकासाठी  आ.भाऊंनी व उमेश सह करूणाताई  वैशालीताई व रेखाताई यांची केलेली तळमळ भाऊंच्या लेखनातून स्पष्ट होते. तसेच भाऊंच्या मनोगत पृष्ठातून आ. भाऊंनी महाराष्ट्रातील शिक्षिका भगिनींसाठी रचलेला तंत्रज्ञानाचा इतिहास मनाला भावूक करते.
     आ. झनकर मॅडम, आ. काळे सर, नाईकवाडे सर, सह मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा पत्रांनी भाऊ सह आपल्या महिलांच्या हातातील लेखनीला गती मिळाल्याशिवाय राहत नाही.
   त्यानंतर सुची पृष्ठांमध्ये  लेख ,काव्य यांचे पृष्ठ क्रमांक व लेखिका, कवियीत्रींचा परिचय यामुळे विशेषांकाची शिस्तबद्दता सहज लक्षात येते.
      सर्वात महत्वाचे म्हणजे विशेषांकातील महाराष्ट्रविषयक कविता, लेख , बडबडगीत यातून महाराष्ट्राच्या गुणगानासह  थोर पुरूष , भौगोलिक . सामाजिक, सांस्कृतिक महाराष्ट्राचा परिचय होतो. तसेच आपल्या उपक्रमशील शिक्षिकांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रमांच्या लेखनातून सावित्रीबाईंचे वारसदार  स्त्री शिक्षणाची मशाल पेटवल्याचे समाधान होते.
     शेवटच्या पानावर दीक्षा अॅप बालभारती विचार तंत्रस्नेही मित्र परिवारातले विविध चित्र यांसर्वातून शैक्षणिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे महत्व कळते.

      एकंदरीत हा विशेषांक आकर्षक  असून आम्ही तंत्रस्नेही महिलांसह अन्य वर्गासाठीही खूप उपयोगी व ज्ञान वाढवणारे आहे.
      या विशेषांकाचे संपादक, आ सुदाम भाऊ, आ. करूणाताई, आ. रेखाताई, आ. वैशालीताई, उमेश व सर्व लेखिका, कवयित्री यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील लेखनासाठी / यशस्वीतेसाठी  खूप खूप शुभेच्छा .

      🙏धन्यवाद 🙏


   समीक्षक
सीता टेकुलवार
   गडचिरोली.
[5/17, 4:28 PM] सुनिता उत्तमराव वावधाने नांदेड: 🙏🌹 *ई विशेषांकाचे समीक्षण*🌹🙏

कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती!
फुलवाया नाती इथलं
अगणित गीत गाती!!
"महा" न इतिहासाने नटते "राष्ट्रा" भिमानी छाती!!
समृध्दतेच्या आकांक्षाच्या लक्ष उजळती वाती !!

⭐1 मे महाराष्ट्र दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.पण या जैविक आपत्तीच्या कठीण काळातही  ई विशेषांक उद्घाटन सोहळा ठेवून धुमधडाक्यात
विशेषांकाचे उद्घाटन झाले.त्यासाठी मोठमोठ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली तोंडभरून विशेषांकाचे कौतुक केले.
एवढा मोठा सोहळा 'ई विशेषांक' खरंच नावाप्रमाणेच खास विशैष आहे यात शंकाच नाही.
मुखपृष्ठ एवढे आकर्षक आहे. श्री शिवाजी महाराजांनी  हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या चित्रांनी अजून सौंदर्य प्राप्त झाले. तेच एवढे आकर्षक तर आतमध्ये आणखी काय, काय...असेल याची उत्सुकता लागून राहते. सुंदर मांडणी आहे पोवाडे, महाराष्ट्राची थोरवी सांगणारे लैख, गीत वैज्ञानिक कोडी असंख्य सुंदर सुंदर साहित्याने हा ई विशेषांक नटलेला आहे.  अनेक लेख वाचनीय बोधपर आहेत. सहजतेने विषयाची उकल होत जाते.
यासाठी आमच्या समुहाचे प्रमुख *श्री सुदाम साळुंके भाऊ*, प्रशासक भगिनी *करुणाताई,वैशालीताई,रेखाताई* यांनी विशेष परिश्रम घेतलेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी श्री शिवाजी महाराजांनी मावळे  गोळा करून त्यांना तयार करूनच स्वराज्य निर्माण केले. तसे आमचे समूह प्रमुख *सुदाम साळुंके भाऊ* यांनी अनेक महिला शिक्षिकांना तंत्रस्नेही बनवून तंत्रज्ञानाचे धडे दिलेत. सर्वांच्या लेखणी चमत्कारातून ई विशेषां- कातील प्रतिभा जाणवते. माझ्या सर्व तंत्रस्नेही भगिनीचे समूह प्रमुख *श्री. सुदाम साळुंके भाऊं* चे मनापासून कौतुक करते. असाच आमचा समूह बहरत, फुलत राहो, अशा गोड शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपविते...
पुढील वाटचालीस शुभेच्छा...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

         *सौ.सुनिता वावधाने, नांदेड*
मो.9405692656

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
[5/17, 4:36 PM] वर्षा भोळे: समीक्षण
1 मे 2020 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ई-बुक महाराष्ट्र दिन या विशेषांकाचे विशेषांकाचे उद्घाटन समारोह खूपच सुंदर पार पडला. त्यात सुदाम दादा ,करुणाताई, वैशालीताई रेखाताई यांनी खूपच मेहनत घेतली आहे आणि मी त्या याची साक्षीदार होते याचा मला अभिमान आहे. मुखपृष्ठासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली गेलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रभरातल्या विविध ज्ञान देणाऱ्या गुरूकडून वेगवेगळे लेख कविता कोडी माहिती खूपच सुंदर छापल्या गेली आहे. तंत्रज्ञानाची सुद्धा त्यामध्ये भर घातल्यामुळे याविशेषांकाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. सुपर ॲक्टिव समूहाचे खूप खूप आभा.र तुम्ही एक नवीन पर्वणी वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. धन्यवाद.
 वर्षा भोळे ,नांदेड
[5/17, 4:48 PM] +91 93098 11804: *🚩१ मे महाराष्ट्र दिन ई - विशषांक*🚩

        *🖊️समीक्षण*🖊️

  *ना कधी झाला , ना कधी होणार*
*असा हा महाराष्ट्र ई - विशेषांक सोहळा*
*Only super activeसमूहावर जमला ज्ञान माऊलींचा मेळा*
*देशात उजळते सुदामभाऊचे ज्ञान - मान -सन्मान उक्तीच्या दीपमाळा*

      विशेषांकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व मोहक आहे . महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र , कामगारदिनाचा स्टॅच्यू , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा लोगो याची मांडणी अतिशय सुरेख आहे . तसेच त्यातील रंगछटा ही मनाला स्पर्शून जाणाऱ्या आहेत .

  या विशेषांकामध्ये वाचकांसाठी शुभेच्छापत्रक मधील कौतुकाची थाप , सुदामभाऊचे मनोगत , लेख , चित्र , काव्य , पोवाडे  , चारोळी , बडबड गीते, महाराष्ट्राची महती , मुलांना खेळू दया लेख , माझ्या आठवणीतील शाळा , प्रश्नमंजुषा , मंगेशची शिष्यवृत्ती, उपक्रमशील शाळा , विविध उपक्रम , अनुभव , शब्दकोडे इ . घटकावर सहभागीनी आपल्या अनुभवाची , ज्ञानाची, विचारांची , शिदोरी शब्दरूपाने यात मांडली आहे .
       त्याचबरोबर डिजिटल गॅलरीमध्ये दीक्षा अॅप, शाळा अॅप, तंत्रज्ञानाचा वापर या विषयी ही माहिती वाचण्यास मिळते .
       हे विशेषांक नक्कीच सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शन पर माहिती देणारे  आहे . सर्व सहभागींना शुभेच्छा .💐💐💐💐
     
          *या विशेषांकाचे संपादक , मुखपृष्ठ निर्माते व समूहाचे सर्वेसर्वा सुदामभाऊ , समूह प्रशासक करुणाताई , वैशालीताई , रेखाताई यांचे मनापासून आभार .*🙏🏻🙏🏻🙏🏻
         असेच विशेषांक वाचण्यास मिळो ही सदिच्छा .🙏🏻🙏🏻

          *समीक्षणकर्ती*
     
*श्रीमती रेखा कंगठीकर  नांदेड*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
[5/17, 5:05 PM] +91 99239 79966: ONLY SUPER ACTIVE शिक्षिका
या समूहाद्वारे आज एखाद्या शिक्षक एखाद्या पुस्तकाचे
समीक्षण करण्याचा हा जीवनातील पहिलाच अनुभव.
महाराष्ट्र दिन विशेषांक यांचे मुखपृष्ठ महाराष्ट्र या शब्दाभोवती गुंफले गेले आहे.    शिवरायांचा पराक्रम त्यांचा इतिहास सहज डोळ्यासमोर तरळून जातो.
         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीचे प्रतीक आपण सर्व सख्या आहोतच .ज्ञान मान-सन्मान हे
येथे आपल्या कार्याचे ब्रीद दर्शविलेयेथे आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर हाती मशाल घेऊन सर्वांगीण प्रगतीचा
ध्यास सगळ्यांनीच घेतलाय याचा प्रत्यय येतोच आणि कामगार दिनाचे प्रतिनिधित्व केलेजाते आहेअसंही वाटते आहे पक्षांप्रमाणे
आपण ज्ञानाने समृद्ध होऊन नभात उंच भरारी घ्यावी असे यातून प्रतीत होत आहे.
अनेकांच्या शुभेच्छांसह या अंकाला सुरुवात होते उषाताई चा पोवाडा महाराष्ट्राची महती गातो जयाताईंची आई कविता मनाला भावते .
भारतीय शैक्षणिक गुणवत्ता विकासात पालकांचा सक्रिय सहभाग हवा कारण लहान मुल हे अनुकरणप्रिय असते हा प्रतिभाताईंच्या विचारही योग्यच आहे टाळेबंदी तून गुंफा ताईंनी माणसात वावरणाऱ्या परमेश्वराच्या विविध रूपांची ओळख करून दिलीआहे महाराष्ट्राची महानता काव्यमय
कोडी यांनी हा अंक अधिकाधिक समृद्ध होतो
शेख  नजमा  यांचा कृतीयुक्त सहभाग मनाला भावतो .रांगोळी ,चित्र यांनी या अंकाची शोभा वाढवली आहे विद्यार्थी सहभाग 'ओ' ची गंमत यातून प्रतीत होतो. रेखाताईंचे विचार
मोलाचे वाटतात . ते म्हणजे प्रत्येक शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी म्हणून जगायला हवं नाविन्य कल्पकता विविधता अध्यापनात जोपासायला हवी उपक्रमशील शाळा लेखनातील उपक्रम प्रेरणादायी व नावीन्यपूर्ण आहेत वैशाली भामरे मॅडम यांचा अनोखा उपक्रम करोना प्रश्न मंजुषा महत्त्वाचा आहे आज त्याची समाजाला खरी गरज आहे
नीलिमा चिंचकर यांनी सुदाम दादांना दिलेली अनोखी गुरुदक्षिणा त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते शाळेची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने टिकून राहण्यासाठी केलेले करुणा त्यांचे प्रयत्न वाचनीय आहेत मुलांना खेळू द्या हे पालकांना पटवून देणे गरजेचे आहे
नंतर चित्र संदेश देतात स्टे अॕट होम वेगवेगळ्या गीतांनी हा अंक पुढे झेपावतो  माझी आठवणीतील शाळाखडतर जीवनातला अविस्मरणीय क्षण या लेखातून सुदाम दादांच्या खडतर जीवन प्रवासाचे वर्णन वाचून मन सुन्न होते आणि यावर मात करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न खूपच मार्गदर्शक वाटतात डिजिटल गेल्यावरही खूपच छान आहे आणि हो सनी उर्फ उमेश यांच्या कल्पकतेलाही सलाम .
                              काही चुकल्यास क्षमस्व.
                         सौ.अश्विनी किसन पाटील
[5/17, 5:15 PM] +91 97633 50325: 1मे2020महाराष्ट्र दिन विशेषांक
समीक्षण
        विशेषांकाच्या मुखपृष्ठावर बघताक्षणीच नजर पडते ती महाराष्ट्राचा  जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर.आपणआपोआपच नतमस्तक  होतो .मुखपृष्ठावर असलेला सावित्रीबाईंचा फोटो, सुपर ऍक्टिव्ह समूहाचा लोगो ,प्रगतीची मशाल ,आकाशात भरारी घेणारे पक्षी मन वेधून घेतात .सुदाम दादांचे मनोगत तर वाचताना च आशयाची कल्पना येते .विशेषांकामध्ये
महाराष्ट्रगीत,पोवाडे ,कवितां मधून तर भगिनींनी महाराष्ट्र
साकारला.बालकाव्याचे तर
करावे तेवढे कौतुक कमीच.
जयताईच्या आई कवितेने तर
समोर आई उभी करून अश्रूंना वाट मोकळी करून दिली .नजमाताईंची मंगेश शिष्यवृत्ती मनाला स्पर्शुन गेली.आणखी काव्यमय कोडेआरोग्यविषयक माहिती सांगून जाते.वंदनाताईंचा  "पालकांनो,मुलांना खेळू द्या "हा लेखही आजच्या पालकांना वाचनीय आहे.टाळेबंदी हा लेख कोरोनाविषयी जागृतीकरतो.सुदामदादांची आठवणीतली शाळा तर स्वतःच्या अनुभव विश्वात घेऊन जाते.शेवटी करुणा ताईंनी घातलेली तंत्रज्ञानाची सांगड ,क्यू आर कोड विशेष आहेत.त्यामुळे हा विशेषांक वाचकांना मिळालेली एक पर्वणीच ठरेल.


पहिल्यांदाच समीक्षण करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे काही चुका असती तर 🙏🙏

सौ.माया गुल्हाने
दारव्हा जि. यवतमाळ
[5/17, 6:23 PM] वृंदा धामणस्कर -पनवेल: विशेषांक समीक्षण
1 मे 2020 महाराष्ट्र दिन विशेषांक

1 मे  हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात.105 जणांनी हौतात्म्य पत्करले आपल्या महाराष्ट्र राज्य स्वतंत्र अस्तित्व आणण्यासाठी.आपण या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देतो,हा दिवस शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही खूप महत्त्वाचा असतो,प्रत्यक्ष साजरा करता आला नाही याची खंत होती मनात......पण यावर्षी कोरोना महिमारीमुळे आपण घरातच वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे,व्हिडिओ मेकिंग,ऑनलाईन टेस्ट अशा अनेक प्रकारे
हा दिवस साजरा केला.
विशेष म्हणजे ''ओन्ली सुपर ऍक्टिव्ह शिक्षिका '' या राज्यस्तरीय तंत्रस्नेही महिला शिक्षिका समूहाचा  '' ई विशेषांक ''
प्रकाशित करणेत आले.
या विशेषांकाचे संपादक श्री. सुदामदादा साळुंके यांच्या कल्पनेतून दर्जेदार अशा विशेषांकाची निर्मिती करणेत आली आहे.
अंकाचे मुखपृष्ठ श्री. उमेश साळुंके यांनी कल्पकता व भारतीय संस्कृतीचा वारसा सर्वांचा विचार करून अर्थपूर्ण व आकर्षक  केले आहे.
     महाराष्ट्र दिन ई विशेषांकामध्ये स्वरचित पोवाडे,कविता,लेख प्रश्नमंजुषा यांचा समावेश असून त्यातून महाराष्ट्राची यशोगाथा, रचना,संस्कार- संस्कृती अशी सुंदर माहिती मिळते.
त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षिका भिगिनींनी राबवलेले स्तुत्य नवोउपक्रम,त्यांची कार्यवाही, फलीतासह वर्णन करणारे लेख
यामुळे अंक रोचक व आगळावेगळा वाटतो.
तंत्रज्ञान युगात शैक्षणिक क्षेत्रही कसे कार्य करते ,अध्ययन अध्यापन करते,विद्यार्थी पालक व शिक्षक यांना जोडून विद्यार्थी जडणघडण करते यावरील लेख आहेत.
        सुदाम दादांच्या सकारात्मक खडतर प्रवासाची कथा  '' माझी आठवणीतील शाळा "  प्रेरणादायी वाटते.
         या अंकातील सर्व लेखांची मांडणी,शब्दरचना छान असून सुरेख आहे.
ज्ञान,मान सन्मान याची प्रचिती येते यातून
येते
एकंदरीत विशेषांक छान उपयुक्त व सुरेख झाला आहे.याचे सर्वस्वी श्रेय सुदामदादा ,करुणा ताई व सर्व लिहत्या ताईंना जाते
[5/17, 6:42 PM] +91 94201 28327: *अतिशय सुंदर असा विशेषांक*

आपलं संपादकीय मनोगत, सगळ्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्यासाठी करीत असलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे. सगळ्यांनी यात दिलेलं योगदान खूप उत्कृष्ट आहे.काव्यमय कोडे,पुस्तक, पोवाडा, तेथे कर माझे जुळती हे सदर , महाराष्ट्र गाणं..... सगळे एक से बढकर एक आहे..  ग्राफिक्स अप्रतिम..
Font size योग्य आहे..वाचन करण्यात हुरूप येतो..

पुढील कार्यास शुभेच्छा👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐

वैशाली मानकर यवतमाळ
[5/17, 7:48 PM] Salunke Sudam: ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
   *१ मे महाराष्ट्र दिन विशेषांक*

        *सुदाम साळुंके सर*

१) *विशेषांक काढण्यामागचा हेतू -*
  महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक आहे, पण ते महान आहे. त्यांच्या मध्ये आपल्या सारख्या नवसाहित्यिकांना स्थान नाही. म्हणून आपल्या सारख्या नव साहित्यिकांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळावे व आपण सुद्धा लेख / काव्य लिहू शकतो हा आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण स्वनिर्मित विशेषांक काढण्याचे सर्वानुमते ठरविले व तुम्ही सर्वांनी सहभाग घेऊन ते कार्य पुर्णत्वास आणले. ज्या सदस्यांनी सहभाग घेऊन  दर्जेदार साहित्य लिहिल त्या सर्वांना मनापासून धन्यवाद व शुभेच्छा . मी एक माध्यम आहे पण लेख / काव्य  लिहिण्याचे काम तुम्हीच केलय आणि त्यातूनच मला व्हायचय साहित्यिकचा पहिला प्रयत्न आपला यशस्वी झाला.

२) *विशेषांकाचे स्वतःडिझाईन करण्यामागचा हेतू*
  *आम्ही सावित्रीच्या लेकी* या पहिल्या विशेषांकाच्या वेळी आलेला कटू अनुभव त्यासाठी वेळ , पैसा खूप खर्च झाला त्यापेक्षा आपणच स्वतः डिझाईन करायचे. या विचाराने नवीन काही शिकायचेच या जिद्दीने कुणाच्याही हातापाया पडायचे नाही. येणाऱ्या समस्या जाणून घ्यायच्या व हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास न्यायचेच आणि माझ्या मुलाच्या सहकार्याने ते ही काम यशस्वी झाले. आणि आपणही स्वतः एखादे पुस्तक तयार करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण बळावला .
३) *समीक्षण करण्यामागचा हेतू*
  आपण पुस्तके वाचतो पण  समीक्षण करण्याचा विचार कधीच केला नाही. आपण लेख / काव्य लिहू शकतो मग समीक्षण करू शकत नाही का? जर प्रयत्न केला तर आपण समीक्षण करू शकतो हा आत्मविश्वास प्रत्येकामध्ये निर्माण व्हावा व आपल्यात लपलेला कवी , लेखक, संपादक, व समीक्षक बाहेर पडावा यासाठी आपणाला समीक्षण करण्यास प्रोत्साहन दिले. आणि  आपण सर्वांनी विशेषांचे अप्रतिम समीक्षण करून समीक्षणाच्याही परिक्षेत सर्व जण पास झालात .
आज केवळ आपल्या एका महाराष्ट्र दिन विशेषांकामुळे सर्व महिला
कवयित्री,लेखिका, संपादिका व समीक्षक म्हणून सर्व पात्र झालातच पण तेही एका आगळ्यावेगळ्या विक्रमाणे.
 *महिलांचा पहिला डिजिटल महाराष्ट्र दिन विशेषांक* म्हणून त्याची नोंद महाराष्ट्र बुक मध्ये राष्ट्रीय रेकॉर्ड म्हणून झाली आहे.
याचे सर्व श्रेय तुम्हाला आहे.
    आज तुम्ही साहित्य क्षेत्रातल्या कवयित्री , लेखिका, संपादिका व समिक्षक म्हणून सर्व पदव्या मध्ये पास झालात .
 सर्व सहभागी कवयित्री, लेखिका व समीक्षक ताईंना मनापासून शुभेच्छा.
  या विशेषांकासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व  सदस्य , प्रशासक, तंत्रस्नेही मित्रपरिवार , अधिकारी, मार्गदर्शक टिमचे मनापासून आभार .

     *सुदाम साळुंके*
      समुह प्रमुख
Only super active teacher
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
[5/17, 8:30 PM] +91 99676 56741: समीक्षण
  महाराष्ट्र दिन विशेषांक खूपच सुंदर अंक आहे. या अंकातील सर्वच लेख वाचनीय आहेत. या अंकातील कविता, महाराष्ट्राचे गुणगान गाणारे पोवाडे ही सुंदर आहेत. पालकांनो मुलांना खेळू द्या हा लेख अतिशय सुंदर आहे. अंकाचे मुखपृष्ठ महाराष्ट्राची महती दर्शविणारे आहे.

सौ. ज्योत्स्ना अमोल बाक्रे
रायगड
[5/17, 9:59 PM] +91 92727 04320: १मे२०२० महाराष्ट्र दिन.

 महाराष्ट्र दिन विशेषांक समीक्षण.

मुखपृष्ठ-महाराष्ट्राला घडवण्यासाठी स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांचे कार्य, शिवनिती. या शिवबाला घडवण्यासाठी जिजाऊ चे कार्य जिजाऊ नसती तर कदाचित शिवबा घडले नसते आणि शिवबा नाही तर महाराष्ट्र दिसला नसता तद्वतच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी धडपडणाऱ्या राज्य स्तरीय शिक्षक उपक्रमशील शिक्षिका समूह या उपक्रमशील शिक्षकांना. शिवबाला घडविणाऱ्या  जिजाऊप्रमाणे
शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या आमच्या माऊली सावित्रीबाई
 फुले यांचा लोगो वाह.....काय कल्पना........

या मुखपृष्ठानंतर  व संपादकीय लेखातच सर्व विषयांचे सारांश लाभलेले आहे यापेक्षा चांगले सारांश असुच शकत नाही याचे श्रेय जाते संपादक सुदाम भाऊ यांना.ज्ञा-मान-सन्मान या ब्रीदवाक्याप्रमाणे कार्य सफल केले आहे.यात प्रत्येक स्त्रीमधली रसिकता,का्व्यता, कलात्मकता, कल्पकता साकारली आहे.
महाराष्ट्र भूमी संतांची छान पोवाड्यातून उषा ढेरे ताईंनी रचली आहे

प्रतिभाताई राऊत. शै.गुणवत्ता
पालक सहभाग- यशस्वी संस्कारशील मुलं ही प्रत्येक कुटुंबाची पुढे वाढत जावून जगाची गरज आहे. शिला शिवाय विद्याफुकाची आहे म्हणून नैतिकता हवी.
जया कुलथे ताई -आई-आईची महती गायली आहे आईला पंचप्राण, महालक्ष्मी ,सरस्वती ,पारिजात, ज्योत ममतेची अशा उपमा दिल्या आहेत.
डॉक्टर गुफा कोकाटेताई- टाळेबंदी -सध्याची करोना परिस्थिती रेखाटली आहे या परिस्थितीत झटणाऱ्यांना त्यांनी सलाम करून देऊ माणसं म्हटले आहे.
सौ.वासंती कोदांडे ताई-महाराष्ट्राची महानता - यात सावित्री, शूर शिवबा, जिजाऊ,नद्या,सण-उत्सव,धर्म यांची  श्रेष्ठता वर्ण‌‌‌ली आहे.

मिनाक्षी नगराळे ताईंनी काव्यमय कोड्यात वैज्ञानिक को,ड्यांची काव्यमय रचना केली आहे.
 अंजु जोशी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर. तंत्रज्ञानाचा फायदा सांगुन मुलांची आईकडे असणारी संगणकाची मागणी काव्यात स्पष्ट केली.
धनश्री गांगुर्डे यांनी सावित्रीबाई फुले यामध्ये सावित्रीबाई व मुलीचे शिक्षणाविषयी चे कार्य स्पष्ट केले आहे.
मीनाक्षी काटकर- महाराष्ट्र गीत- शिवबा, सावित्रीबाई,
बाबासाहेब आंबेडकर ,भगतसिंग ,राजगुरू, सुखदे,अशा थोरात्मांची  थोरवी गायली आहे.
शेख नजमा मैनुद्दीन. -मंगेश शिष्यवृत्ती-वाळकेवाडी
शाळेचा नवा इतिहास. माझे पप्पा निबंध स्पर्धा यातून तयार झालेले शिष्यवृत्ती योजना त्यातून ऐतिहासिक क्रांती घडली.
सुनिता इंगळे ताई यांनी पुस्तक यात मोबाईल मुळे पुस्तकाची झालेली स्थिती या कवितेत स्पष्ट केली आहे.

कल्पना झाल्टे ताई -मनात विचारांचा कहर -मन ,शब्दफुले ,भावना वर्णन केले आहे या काव्यात.
मनीषा कुलकर्णी ताई -सर्वस्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती- सुदाम भाऊ व त्याच्या प्रेरणेने घडलेला राज्यस्तरीय तंत्रज्ञानयुक्त उपक्रमशील समूह याची ओतप्रोत माहिती यात भरली आहे.

प्रियांका साळुंके ताई_ अक्षय तृतीया रांगोळी -अखंड तेचे प्रतीक असणारा स्वस्तिकमय घट या रांगोळीत रेखाटला आहे.
स्मिता नवघरे -एक मे महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा लोगो.
वर्षा भोळे ताई- महाराष्ट्र माझा महाराष्ट्राची शान गायली आहे.
महाराष्ट्र गाथा.
-उर्मिला लासूरकर ताई. -
शिवबा ,जिजाई ,ज्योतिबा, सावित्री, बाबासाहेब, साधुसंत यांचे महान कार्य काव्यबद्ध केले.

शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज (फायदे )-शोभा दळवी. _देश महासत्ता करण्यास,
उज्ज्वल भविष्य साकारण्यास तंत्रज्ञानाची कास धरत उपयुक्तता स्पष्ट केली आहे.

चला घडवू या प्रगत महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर. -मंगळा अळसपुरे ताई-
मंगळाताई व त्यांचे विद्यार्थी तंत्रज्ञान उपयोजन स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र माझा महान. सुनिता वावधाने ताईंनी महाराष्ट्राची
 महती स्पष्ट केली आहे.
ओके ची गंमत- ओंकेश्वरी खडसे-ओयुक्त शब्दरचना स्वरबद्ध केली.
छाया कांबळे ताई -महाराष्ट्र माझे थोर भूमी यात महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे.
मनीषा शेजोळे ताई. -गुणगान आम्ही गातो-
महाराष्ट्रभूमीत जन्मलेल्या थोरांचे महती गायली आहे.

शुभेच्छा लोगो मधून अनेकांनी या  विशेषांकास शुभेच्छा दिल्या  आहेत.
रेखा शिंदे ताई शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसे असावे हे वर्णन केले आहे.

जया कुलथे ताई-यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक अनुभव यशोगाथा -यात आपल्या शाळेचा वाढता पट व प्रगत शाळा कशी केले आहे. हे वर्णन आहे.
आमची उपक्रमशील  शाळा-अनुज ढुमने यांनी नाविन्यपूर्ण १२ उपक्रम  सादर केले.

कविता खुदाले ताई यांनी महाराष्ट्र माझा मध्ये महाराष्ट्राची थोरवी गायली आहे.
मंगला खोप यांनी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची थोरवी झाली आहे.

स्टडी फ्रॉम होमसाठी शाळा अॅप मधुकर माळी यांनी सुदामभाऊच्या मार्गदर्शनाने निर्माण केलेला क्यूआर कोड. आहे.
घरी बसून होऊ शकतात सहभागी -वैशाली भामरे -कोरोना जनजागृती संबंधित प्रश्नमंजुषा लिंक सादर केली आहे त्याद्वारे राज्यातील दोन हजारांनी सहभाग नोंदवला आहे.
छाया गायकवाड यांनी महाराष्ट्र माझा यामध्ये महाराष्ट्राची थोरवी गायली आहे.
आनंदायी शिक्षण-उषा ढेरे ताई- शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे त्यांनी या शिक्षणाविषयी लिंक तयार केली आहे. तीही येथे शेअर केली आहे.
माझा तंत्रज्ञानातील वेबसाईट पर्यंतचा प्रवास -आपल्या समूहा विषयीची थोरवी त्यांनी वर्णन केली आहे -केली निलिमा चिंचकर ताई
स्मिता नवघरे - छत्रपती शिवाजी यामध्ये शिवरायांचे कार्य गायन केले आहे ..
सुनीता इंगळे ताई-study from home प्रश्नमंजूषा उपक्रम- या उपक्रमाचे फायदे व कार्यवाही स्पष्ट केली आहे.
योगिता कोठेकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई-  सावित्रीबाईंचे कार्य गायले आहे.
एक मे महाराष्ट्र दिन कल्पना झाल्टेताई-गुरूमहिमा वर्णन केला आहे.
प्रश्नमंजुषा- प्रतिमा साळुंके ताई- महाराष्ट्र बाबत प्रश्न विचारले आहेत.
मुल्यशिक्षणाची गरज -आरती कोरडकर -मुल्यसंस्कार व त्याद्वारे होणारा विकास वर्णिला  आहे. तसेच लेक ते सावित्री ची मुलगी रूपी तारा सावित्री चे वर्णन झाले आहे.
महाराष्ट्र माझा- अरुण पवार -महाराष्ट्राची थोरवी गायली आहे.
शैक्षणिक वाढीसाठी माझे उपक्रम- करूणा गावडे ताई- विविध अफलातुन 10 उपक्रम व गुणवत्ता विकास यात स्पष्ट केला आहे.
माझ्या महाराष्ट्र भूमीचा मला वाटे भारी अभिमान- शीतल मापारी ताई- महाराष्ट्राची कर्तव्यतत्पर ता स्पष्ट केली आहे.
चित्रलेखा जाधवांनी महाराष्ट्राची महती गायली आहे.
महाराष्ट्राचे गीत गाते मी अभिमानाने -वैशाली भामरे -थोरमय महाराष्ट्र गायला आहे.
माझा महाराष्ट्र -रुपाली गोजवडकर महाराष्ट्राची कीर्ती गायली आहे.
पालकांनी मुलांना खेळूद्या -वंदना कोशरवार- सर्व पालक व मुले घडवणे खेळाद्वारे स्पष्ट केले आहे.
 बडबडगीत-सुरेखा ठाकरे- मुले व शाळा विषयी गीत आहे.
माझा महाराष्ट्र -रुपाली गोजवडकर- महाराष्ट्राचा गौरव केला आहे.
क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले-स्मिता नवघरे-ज्योतिबांचे कार्य गीतातून स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझे उपक्रम-प्रियंका ढोले ताई- यांनी नवउपक्रमाचे महत्त्व विषद केले आहेत.

माझी आठवणीतली शाळा- सुदाम साळुके भाऊ- खडतर जीवनातले अविस्मरणीय क्षण-बदली आदेश मिळाल्यानंतर असलेली दयनीय अवस्था स्पष्ट केली आहे .भाऊ हे  वाचताना जणूकाही मी माझीच कथा  वाचतेअसा अनुभव कारण मीही २०१९-२०ला , online बदलीप्रक्रियेत विस्थापित होवून सध्या जाण्यास वाहन नाही, नेटवर्क नाही,पावसाळी पूरमय अवस्था, अशा अतिदुर्गम भागात काम करते.पण आनंदी आहे.
आता रडायचं नाही तर लढायचं
आपल्याला हे सामर्थ्यशाली वाक्याने जीवन जगण्याचे बळ मिळते.भाऊंनी अनुभवलेले पूर व इतर अतिप्रसंग वाचुन मन छिन्न होते.भाऊ मायलेकरांची अविस्मरणीय भेटीचे वर्णन व त्यानंतर आईला देवाज्ञा हा प्रसंग वाचून डोळे गहिवरून आलेत.
    भाऊंनी उपक्रम राबविण्यासाठी कार्टूनमध्ये स्पिकर टाकले ही अफलातून कल्पकता.विविध प्रयोगातून शाळेचा कायापालट करणारे भाऊ.खडतर परिस्थितीत शुन्यातून विश्वनिर्मितीची जिद्द येथे साकारली आहे.
शुभेच्छा पत्र-करुणा गावंडे ताई-हे शुभेच्छापत्र म्हणजे या विषेशांकाचे समीक्षणच आहे.सारे सार यात भरले आहे.
Digital Gallery-अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाग यात २४ QR Code चे उपयुक्त उपयोजन केले आहे.
       🙏🙏धन्यवाद 🙏🙏
                                                             समीक्षक-सौ.हर्षला हरेश पाटील.
                                                                    ता.वाडा,जिल्हा.पालघर.
[5/17, 10:23 PM] +91 94227 56489: महाराष्ट्र दिन विशेषांक.                  तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार ,याची प्रचिती या अंकातुन आली.                          प्रश्नही तुच:उत्तर ही तुच.निर्मातीही तुच:निर्माण ही तुच.        असेच रुप आहे या अंकाचे.स्रियांना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातुन मिळाले.महाराष्टाच्या संस्कृतिची छबी लेखणीतुन उमटली.शैक्षणिक परिपुर्णतेचा आरसा उमटविण्याचा  प्रयास यशस्वी ठरला आहे. आत्मविश्वास बरोबरच स्रुजनसिलतेचा आविष्कार बघायला मिळतो. मुखप्रुष्ठ पासुनची कुतुहलता अंतरंगात टिकली ,शेवटी दिलेल्या डिजिटल ग्यलरी मुळे तंत्रञानाची उपलब्धता  शिक्षकाच्या सिद्धि चे दर्शन घडविते.मांडणीतुन व्यवस्थापकीय कौशल्य दिसते.          वाचकाला सतत खिळवत ठेेवण्यात यशस्वी ,👍👍👍👌👌👌                फक्त एकच सांगावेसे वाटते ,काव्य,पोवाडे, विविध रचना यांना समर्पक चित्र दर्शविल्याने परिणामकारकता अजुन वाढली असती.💐💐💐💐💐💐💐💐.     ज्योती मोराणे.नासिक (चांदवड) .
[5/17, 10:50 PM] Shaila Alaspure: 1मे महाराष्ट्र दिन विशेषांक  समिक्षण

            महाराष्ट्र दिन विशेषांक वाचला आणि तो मनापासून आवडला. चला घडवू या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उद्देशाने प्रेरित होऊन तयार केलेला हा विशेषांक निश्चितच दिशा देणारा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिलांना लिहिण्याची प्रेरणा देऊन त्यांच्या अनुभवांना शब्दबद्ध करून इतरांपुढे मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे महाराष्ट्र दिन विशेषांक होय.
           विशेषांकाचे संपादक सुदामभाऊ यांनी आपल्या मनोगतातून समुहाची कार्यप्रणाली सांगितली आहे. त्यांचा "माझी आठवणीतील शाळा" हा लेख कठीण परिस्थितीतही चांगले ध्येय गाठण्याची प्रेरणा देतो. विशेषांकातील सर्वच लेख, काव्यलेखन, पोवाडा, महाराष्ट्र गीत, शैक्षणिक उपक्रम हे सर्व बरेच काही शिकवून जाणारे , दिशादर्शक आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ फारच आकर्षक आहे.
          सुप्त गुणांना वाव देणारा उत्कृष्ट आणि उपयुक्त अशा विशेषांक निर्मिती बद्दल संपादक आ. साळुंके सर तसेच विशेषांकाच्या सर्व परिवाराचे मी मनापासून आभार मानते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[5/17, 11:01 PM] Vanita Dhakait Panvel: महाराष्ट्र दिन विशेषांकांचे समीक्षण.

1 मे महाराष्ट्र दिन.कामगार दिन. या दिनाचे औचित्य साधून ओन्ली सुपर ऍक्टिव्ह शिक्षिका. या समुहाचा  महाराष्ट्र दिन विशेषांकाच्या अनावरण सोहळा पार पडला. समूह प्रमुख श्री सुदाम भाऊ साळुंके. व समूह प्रशासक करुणाताई.रेखाताई,वैशालीताई यांच्या परिश्रमातून व मार्गदर्शना मधून. विशेष अंकाची निर्मिती झाली. अतिशय सुबक व देखणा अंक. मुखपृष्ठ बाबत बोलायचं तर थोर महापुरुषांचे दर्शन यामधून घडते. मशाल पेटवून उभे असलेले या चित्रांमधून शैक्षणिक वाटचाल आपल्या आपल्या लक्षात येते. थोडक्यात थोर महापुरुषांचा वसा घेऊन आम्ही सुपर ॲक्टिव महिला ज्ञानाची ही मशाल अशीच पेटवत ठेवू इतकं बोलक स्वरूप  मुखपृष्ठचे  आहे.
विशेषांकाचे अंतरंग.
या विशेष अंकामध्ये अनेक लेख आहेत. कविता. चित्र. काव्य कोडे. तसेच शाहिरी पोवाडे अशा एक से बढकर एक ज्ञानलालसा पूर्ण करणाऱ्या गोष्टींचा जणू खजिनाच संपादित केलाय. विशेष म्हणजे विशेषकांची नोंद ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने’ घेतली ही बाब खूप अभिमानास्पद आहे. या विशेषकातील प्रत्येक ,लेख, काव्य, महाराष्ट्र गीत, पोवाडे. विविधशैक्षणिक उपक्रम. लोकसहभागातून झालेल्या शाळेचा विकास. माहिती तंत्रज्ञान यामधून शैक्षणिक गुणवत्ता वाढ. अध्यापनात तंत्रज्ञान चा प्रभावी वापर. यशोगाथा. शैक्षणिक वाटचाल. पालक सहभागातून शैक्षणिक वाटचाल. सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र रेखाटणारे विविध लेख.आठवणीतील शाळेमधील काही खडतर अनुभव. आमची उपक्रमशील शाळा. आनंददायी शिक्षण. महाराष्ट्राची यशोगाथा व्यक्त करणारे काव्य, पोवाडे. शिक्षणातील मुल्यशिक्षणाची गरज.असे प्रेरणादायी विविध लेख या विशेष अंकामध्ये समाविष्ट आहेत. या विशेषकांमधून नवोदित साहित्यिकांना लेखन संधी प्राप्त झाली.विशेषांकाच्या डिजिटल गॅलरी मधून. दीक्षा अँप, बालभारती अशा अनेक क्यूआर कोड चा समावेश केला आहे. याचा उपयोग अभ्यास सोपा करण्यासाठी अध्ययन अध्यापनात नक्कीच केला जातो. दर्जेदार आकर्षक विशेषांक पाहतांना मुखपृष्ठ व मलपृष्ठ फारच आकर्षक आहे.
या अंकाची सुबक मांडणी करणाऱ्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन.
शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याच्या शुभेच्छा या अंकाला प्रदान केल्या आहेत.  हा विशेषांक म्हणजे वाचकांसाठी एक उत्तम पर्वणी आहे.
एकूणच हा विशेषांक म्हणजे वाचकांसाठी एक उत्त्तमपर्वणी ठरणार आहे.

सौ.विनिता धकिते
नाविमुंबई
[5/17, 11:19 PM] +91 94212 25630: समीक्षण

                           1 मे 2020 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ई-बुक महाराष्ट्र दिन या विशेषांकाचे विशेषांकाचे उद्घाटन समारोह खूपच सुंदर पार पडला.
 एक आनंदरुपी शब्दांकन सोहळा ज्यासाठी आपले नेहमीच आदर्श व प्रेरणास्थान असणारे आपले समूहाचे आधार वड सुदामभाऊ यांनी मुखपृष्ठासाठी  खूप मेहनत घेतली. तसेच भाऊंच्या सोबतीला सर्वगुणसंपन्न अशा करुणाताई ,वैशाली ताई व रेखा ताई यांच्या अगाध ज्ञानाची व कर्तृत्वाची जोड.यात
महाराष्ट्रातील हुशार व तंत्रस्नेही ज्ञानमाऊली यांचे  वेगवेगळे लेख कविता, कोडी, माहिती खूपच सुंदर छापल्या गेल्या आहेत व त्यामुळे आणखी रेखीवपणा वाढला आहे.प्रत्येक पानावर व नंतरही उत्सुकता वाढविणारे लेख व कविता आकर्षक आहेत.यासाठी मी सुपर ॲक्टिव समूहाचे खूप खूप आभार .तुम्ही एक नवीन पर्वणी अनेक ज्ञात व अज्ञात वाचकांसाठी उपलब्ध करून दिली.माझ्या या ज्ञानरुपी कर्तुत्वाला उभारी दिली. माझ्या या अज्ञानरुपी मंदिरात ज्ञानरुपी दिवाताई व भाऊंनी तेवत ठेवला व माझ्यासारख्या अनेक भगिनींना ही प्रेरणा दिली.

   कर्तुत्वाला मिळाली उभारी
   येऊनी या समूह अंतरी
  नवीन शिदोरी सुधारित तंत्रज्ञानाची
ताई -भाऊ नात्याची ओळख या समूहाची

सौ.वासंती कोदांडे
सांगली
[5/17, 11:23 PM] +91 98904 96566: महाराष्ट्र  दिन  विशेषांक  समीक्षण.
हा अंक मी वाचला  मला  तो  खूप खूप  आवडला .महिलांना लेखनाला  सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली  त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद आपल्या  या  अंकात  इच्छा  असूनही  सहभागी  होता आलं  नाही  म्हणून  खूपच  वाईट  वाटते.विशेषांकातील  लेख  व कविता प्रेरणादायी  आहेत. ऊपक्रम  आवडले. मुखपृष्ठ  व मलपृष्ठ  सुंदर  आहे.
या अंकाच्या र्निमितीसाठी संपादक  दादा व सहकारी  यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा .विद्या् कुलकर्णी. गारगोटी कोल्हापूर
[5/18, 12:10 AM] +91 92602 97392: 2020/05/15 15:12:12  समीक्षण  -E विशेषांक
          1 मे महाराष्ट्र दिनाचेऔचित्य साधून "चला घडवू या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र"हा विशेषांक प्रकाशित केला.विशेषांक निश्चितच दिशा ,प्रेरणा देणारा आहे विशेष म्हणजे या विशेषांकाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ  रेकॉर्डने घेतली सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
        ज्ञान  -मान - सन्मान ब्रीद वाक्य ला अनुसरूनच हा विशेषांक आहे.विशेषांकाचे मुखपृष्ठ सुंदर व बोलके आहे.लेख ,काव्य,पोवाडे,प्रश्नमंजुषा,बडबड गीते , विविध उपक्रम ,अनुभव,शब्दकोडे,दीक्षा दीक्षा ॲप,Qr  कोर्ड्स यांचा समावेश उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आला आहे .ज्याचा  उपयोगअध्ययन अध्यापनात सहजपणे होईल. विशेषांक  स्वनिर्मितीचा  आनंद  देणारा , मार्गदर्शक  आहे सर्व  भगिनी  , सुदाम  भाऊ  यांनी  हि  वाचनीय  मेजवानी  लॉक  डाऊन  च्या  काळात  दिली  त्या  बद्दल  सर्वांचे  मनापासून  धन्यवाद  🙏🙏

            मनिषा रविंद्र नाझरे
              महाड  - रायगड
[5/18, 12:28 AM] +91 99215 42258: 🌹 विशेषांक समीक्षण🌹
1 मे 2020 महाराष्ट्र दिन विशेषांक

1मे हा दिवस महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस म्हणून साजरा करतात. याच दिवशी कामगार दिवस असतो. पण यावेळी महामारीमूळे आपण तो घरातच साजरा केला.
या अंकाचे संपादक श्रीमान सुदाम सांळुके सर यांच्या सुंदरशा कल्पनेतून सर्वसमावेशक, दर्जेदार अशा विशेषांकाची निर्मिती करण्यात आली.            मुखपृष्ठ    यात स्वराज्य संस्थापक, श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे  कार्य. त्या प्रमाणे आमच्या सारख्या लेकीना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या अंगावर चिखल फेक सहन करणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा लोगो. अतिशय सुंदर कल्पना. 👌🏻
ब्रीदवाक्य- ज्ञान मान सन्मान
या ब्रीदवाक्यावरुन सरांच्या, सुचकाच्या ज्ञानाची कल्पना येते. ज्यांच्याकडे ज्ञान आहे. त्याला मान आणि सन्मान मिळतो.🙏🏻
तसेच स्त्री  (शिक्षिका) याच्यातील कला, रसिकता, नाविन्य, चिकित्सा कल्पकतेने साकारली आहे.
जया ताईनी आईची महती मांडली आहे.
या महतीतून त्यांनी आईला धनदेवता, विध्यादेवता, बलाढ्य योध्दा अशी सार्थ प्रतिमाने वापरली आहेत.
पोवाडा, महामारीत कार्य करणारी देवमाणसं, महाराष्ट्राची महती छान साकारली आहे. अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती, थोरांची महती, शूभेच्छा लोगो, विद्यार्थी- शिक्षक नाते पट, गुणवत्ता विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळा अॅप, क्यूआर कोड, प्रश्न मंजूषा, मुलांना खेळू देणे, बडबड गीते,
सरांनी काही अविस्मरणीय क्षण नोंदविले आहेत. या विशेष अशा विशेषांकात अध्ययन अभ्यासासाठी लागणा-या सर्व विषयाची मांडणी केली आहे.
हे सर्व करत असताना खूप काही महत्त्वाचे क्षण गमवावे लागतात तरी समाजसेवा, राष्ट्रसेवा समजून आपला अमूल्य वेळ देणा-या सर्व बंधूभगिनिस त्रिवार 🙏🏻🙏🏻🙏🏻वंदन
समीक्षक- सौ.नाईकनवरे मंगल भागवत
ता.जि.लातूर
[5/18, 7:15 AM] +91 99213 23349: समीक्षण
  महाराष्ट्र दिन विशेषांक बाबत सांगायचे म्हणजे यात पूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातुन जणू योगायोगाने या ग्रुप च्या निमित्ताने लेखक, कवी, अभ्यासक तसेच शाळेत येणाऱ्या प्रत्येक problem चे solution देणारे मार्गदर्शक एकत्र आले आणि अशा व्यक्ती मुळे महाराष्ट्र दिन विशेषांक निर्मिती झाली. यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले उपक्रम,  शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर,  खूपच सुंदर अंक आहे.
या अंकातील विशेष म्हणजे मंगेश वाळके या विद्यार्थ्यांचा 'माझे पप्पा ' हा निबंध.
माझा जिल्हा नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे.या विद्यार्थ्यांचे निबंध लेखन जेव्हा एका ग्रुप वर आले तेव्हा मी त्या ग्रुप ला आवर्जून सांगितले की आमच्या active शिक्षिका ग्रुप मध्येच त्या मंगेश च्या मॅडम  नजमा शेख मॅडम आहेत .माझ्या सहशिक्षिकाना विशेष वाटले आणि मला सांगितले की add करून द्या. पण ग्रुप फुल होता.मंगेश च्या निबंधामुळे आज अशा निराधार मुलांना आधार मिळाला.पण 1 विचार करण्यासारखे आहे. जर शेख मॅडमांनी निबंध वाचून फक्त हळहळ व्यक्त केली असती आणि प्रचार केला नसता तर हे काहीच झाले नसते. परंतु त्यांनी प्रसारमाध्यमांचा वापर करून मंगेश सारख्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची कायापालट करण्याइतपत विद्यार्थीहीतचिंतक म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे. अशा  या ग्रुप मधील सहशिक्षिका ज्यांनी लेख ,कविता तसेच डिजिटल गॅलरी या विशेषांकात add केले आहेत त्यांचे आभार मानते.
                         श्रीमती संगिता वाघ
                                  नंदुरबार
[5/18, 8:12 AM] +91 72630 98098: 🚩*१ मे २०२० महाराष्ट्र दिन* 🚩       
🌺 ई-विशेषांक समीक्षण 🌺                                      only super active  समुहाचा महाराष्ट्र दिन विशेषांक वाचला खूप मनापासून आवडला.
"चला घडवू या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" हा विशेषांक निश्चितपणे सर्वांना खूप प्रेरणादायी ठरेल. सर्व महिलांना आपले विचार लेखनातुन सर्वांनपर्यंत पोहचविण्यासाठी उत्तम साधन म्हणजे हा विशेषांक.
विशेषांकाचे संपादक
*मा.श्री.सुदाम साळुंके सर*  यांचे खूप मनापासून आभार 🙏🏻मानते. आज या विशेषांकाच्या निमित्ताने मला विविध लेख, कविता, पोवाडे वाचायला मिळाले.
या विशेषांकात माझ्या ताई धनश्री गांगुर्डे यांनी ही *सावित्रीबाई फुले* हा लेख खूप छान लिहिलाय. तिच्या या लेखानातून प्रेरणा घेऊन मी ही लेख, कविता लिहण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. विशेषांकातील  शिक्षक, शिक्षकांचे शै.अनुभव इ. लेख खूप प्रेरणा दायक आहेत.
आई, मनात विचारांचा कहर इ. कविता 👌🏻 अप्रतिम. विशेषांकाचे मुखपृष्ठ, सजावट व नियोजन खूपच👌🏻 छान केले आहे. *महाराष्ट्र दिन* विशेषांक आमच्या साठी खूपच प्रेरणा दायक ठरेल, अशा उत्कृष्ट व उपयुक्त विशेषांकाची निर्मिती केल्याबद्दल संपादक *मा. साळुंके सर* व विशेषांकात सहभागी सर्वाचे मनापासून आभार मानते.🙏🏻                 


मित्तल गांगुर्डे
पुणे
[5/18, 1:25 PM] +91 98503 10046: १मे २०२०महाराष्ट्रदिन विशेषांक समीकरण

कोरोनामुळे १मे महाराष्ट्र दिन सोहळा घरातच साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त श्री.सुदाम साळूंके सरांनी एक आगळीवेगळी  प्रेरणादायी भेट आपल्या "onli supar active"समुहाला दिली. प्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार.
विशेषांकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून महाराष्ट्रातील सर्व महिला साठी प्रेरणादायी आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या हातात लेखणी घेऊन त्यांच्या तील साहित्यिकाला जागे केले .
या विशेषांकात अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, कविता,लेख, प्रश्नमंजुषा,दिक्षाअप,या सर्वांचा समावेश करण्यात आला.
यासाठी प्रयत्न करणार्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻

सौ.संध्या श्रीकांत परदेशी
ता. दिंडोरी जि.नाशिक

[5/18, 1:48 PM] कल्पना झाल्टे धुळे: Date: 18 May 2020

१मे २०२०महाराष्ट्रदिन विशेषांक समीक्षकरण

१मे महाराष्ट्र दिन सोहळा घरातच साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त श्री.सुदाम साळूंके सरांनी एक आगळीवेगळी  प्रेरणादायी भेट आपल्या "only supar active"समुहाला दिली. प्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार.
विशेषांकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून महाराष्ट्रातील सर्व महिला साठी प्रेरणादायी आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या हातात लेखणी घेऊन त्यांच्या तील साहित्यिकाला जागे केले . व शालेय उपक्रम राबवलेले कृतीच्या माध्यमातून ते लेखनीत उतरवले.
या विशेषांकात अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, कविता,लेख, प्रश्नमंजुषा,दिक्षाअप,या सर्वांचा समावेश करण्यात आला.सुदाम भाऊ , करूणा ताई  , वैशालीताई , रेखाताई याच्या  गुणांचं कौतुक करणे गरजेचे आहे आडात  असेल तर पोहरात येते म्हणून ज्ञान असेल तर मान हा नक्कीच मिळतो. आणि कष्टाला फळ येते .सुदाम भाऊ व करूणा ताई  आणि समूहातील सर्व च उपक्रमशील शिक्षिका  याच्या ज्ञानातून ज्ञानात्मक ज्ञानाची शिदोरी म्हणजे 1 मे विशेषांक हा प्रकाशित झाला .स्वयंम् प्रकाशित  ...

यासाठी प्रयत्न करणार्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 🌹🌹
श्रीमती कल्पना महादेव झाल्टे धुळे
[5/18, 2:06 PM] +91 94203 69623: ✏📕📕📙📙📕📕✏
     *१मे २०२०  महाराष्ट्र दीन*
*ई विशेषांक समीक्षण*
               Only super active समूहाचा महाराष्ट्र दीन विशेषांक मला वाचायला मिळाला त्याबद्दल मी या ग्रुपचे सर्वप्रथम खूप आभार मानते.
अतिशय सुंदर अशी रचना असलेला हा विशेषांक खूप खूप आवडला.प्रत्येक लेखात नवीन अशी माहीत मिळते.
श्री सुदाम साळुंके सर लिखित "माझी आठवणीतली शाळा"वाचुंन त्यांचा खडतर प्रवास अनुभवायला मिळाला.विविध शैक्षणिक उपक्रम लेखातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ज्ञान मला मिळाले.विशेषतः करुणा ताईंचे आणि अनुज दुमने सर यांचे उपक्रम खूप आवडले.
"पालकांनो मुलांना खेळू द्या"हा लेख पण अतिशय सुंदर वाटला."पुस्तक"ही कविता अतिशय सुंदर आहे त्यातून पुस्तक आणि डिजिटल साहित्य एक वास्तववादी सत्य जाणायला मिळते.
तसेच महाराष्ट्र आपल्या राज्याची यशोगाथा सांगणारे लेख,पोवाडे व कविता अगदी मनापासून आवडले.सर्व माझ्या शिक्षक बंधू नी घेतलेले श्रम या विशेषांकात दिसून येते.
हा विशेषांक आम्हा सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरला आहे.अशा उत्कृष्ट विशेषांकाचे निर्मिती केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते.
  *Congratulations all of u*
Komal karnewar,
Nagpur

No comments:

Post a Comment