सामुहिक महाकाव्य १

*महाराष्ट्राचे जयगान*

कडेकपारी सह्यगिरीच्या घुमू लागले वारे,
जयगान गाती महाराष्ट्राचे,नभी सूर्य अन तारे!!
दगडांचा हा देश याची पोलादी छाती,
मर्द मराठे वीर आम्ही,नाही कुणाची भीती,
एकमेका सवे जपतो, माणुसकीची नाती,
पराक्रमाच्या गाथा आणती अंगावरती शहारे!!
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे!!१ 
काव्यरचना-अपर्णा ढोरे,अकोला

★ महाराष्ट्राची संस्कृती
भाषा, शैली, आभूषण
लावू झाडे,वाचवू पाणी
असे निश्चय कणकण

प्रणाली कदम, मुंबई

★एक मे दिनी आहे घेतला मी ध्यास
करून  अभ्यास
आता एकच विश्वास
निकालात  पास.
     शिवाजी  नामपल्ले अहमदपूर

★सामूहिक महाकाव्य
उदघाटन भव्यदिव्य,
गातो गुणगान साहित्यिकाच
ऐतिहासिक दिवस आजच
कवी:सुरज अंगुले
(साहित्यिक जिल्हाआध्यक्ष,पत्रकार)

★काव्यलेखनाच्या वृक्षाला ,
शब्द भावनांचा मोहर ॥
महाराष्ट्रातल्या कवींचा,
ऑनलाईन कहर ॥

जालींदर राऊत ( पिंपरी चिंचवड

★पंढरपूरचा वारकरी अन सह्याद्रीचा धारकरी,
उन्नत,पवित्र महाराष्ट्र देशा,
हीच ओळख तुझी खरी!
सार्थ अभिमान तव महानतेचा,
वसतो आमुच्या अंतरी,

कवी:श्री बाळासाहेब शिंगोटे
खडकवाडी,ता पारनेर,जिल्हा-अहमदनगर

★वेरुळ अंजिठा असे
 महाराष्ट्राची शान!
गड किल्ले जपूनी आपण
उंचवू सदा महाराष्ट्राची मान!

       राजेंद्र महाजन
      वेरुळ औरंगाबाद .

★अनेक पंथ,धर्म अनेक जाती
तरी एकदिलाने सारे नांदती
जपूया सारेजण माणुसकीची नाती
1 मे दिनी महाकाव्य सारे रचती

मिनाक्षी नागराळे,वाशिम(कवयित्री)
आदर्श उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका...

★ माझ्या महाराष्ट्राची काय सांगू महती
विविधतेत एकता हीच याची ख्याती
माझ्या महाराष्ट्राचा आहे मला अभिमान
महाराष्ट्र राखतो जगात देशाची शान

प्रतिभा नारायण बोबे,(शिक्षिका)
राहुरी, अहमदनगर

★ महाराष्ट्र हा अभिमान भारता
जिथे वाहती सागर सरिता
माझा अभिमान कविता
लिहिण्या तिला बळ येवो हाता

..शोभा वळसंगकर ...बीड

★स्वदेशीचे रणशींग वाजले।
शिवबाचे पराक्रम गाजले।
वाजे आज सनई चौघडे।
जय जय महाराष्ट्र  हो घडले।
अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
लेखिका/ कवयित्री
भंडारा

★ माझ्या महाराष्ट्राच्या मातीत
जणू ध्येयाचा सुगंध
नांदते सुखी सर्वजन
तोडून परंपरेचे बंध....

               रचना
      श्रीम.शोभा सुरेश दळवी(शिक्षिका)
                 जि-बीड

★ महाराष्टाने गाजला देश,
विविधतातून एकता असा वेश,संपवूया जातीय क्लेश, चला देवू महाकाव्यातून हा संदेश....
प्रियंका ढोले/वायकोस. अहमदनगर.

★संस्कृतीची खाण
आहे महाराष्ट्रामध्ये
सर्व सण होतात साजरे
येथे आनंदामध्ये

संध्याराणी कोल्हे (शिक्षिक)
 जि.औरंगाबाद

★जाती,धर्म, समभाव आमचे
मुस्लिम,शिख आणि हिंदू
महाराष्ट्राच्या आदर्शापायी
सांडीले आम्ही रक्तबिंदू

               रचना
      श्रीम.शोभा सुरेश दळवी(शिक्षिका)
                 जि-बीड       

★ जय जिजाऊ, जय शिवराय ।
 महाराष्ट्राची शान।       
  फुले, शाहू, आंबेडकर ।
माझा महाराष्ट्र महान। 
*पुरुषोत्तम नाहगमकर (विषय शिक्षक) चंद्रपुर*

★महाराष्ट्राचे जयगान
गुंजतो दरी कपारीतून,
सुर्य, चंद्र, तारे झाले प्रकाशित
निर्माण सोहळा काव्यातून.!!

प्रणाली कदम

★ महाराष्ट्र माझा


महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा
सर्वांगिण भुमित मी घेतला जन्म
संस्कारक्षम वसा ठेवीन सर्वांचा
हे विधात्या महाराष्ट्रातच दे पूनर्जन्म..


- सिद्धार्थ सपकाळे इगतपूरी नाशिक
★स्वातंञ्यासाठी लढली आहे
माझ्या महाराष्ट्राची माती
 सर्वधर्मसमभावाने मग
नांदते आमुची नाती....

               रचना
      श्रीम.शोभा सुरेश दळवी(शिक्षिका)
                 जि-बीड
           
★महाराष्ट्र देश माझा, मराठी  वाणी.
सर्वधर्म समभाव,उच्च नीच न कोणी.
शेतकरी राजा अन् , विद्या असे राणी.
मर्द आम्ही शिवबांचे , राष्ट्र असा गुणी.

सीता टेकुलवार
  (शिक्षिका)
   गडचिरोली.
★ महान राष्ट्र असे माझा महाराष्ट्र
गाऊ त्याचे आज गर्वाने गुणगान
शाहू फुले आंबेडकर नरश्रेष्ठ तसेच
जन्मला भूवरी या शिवबा तो महान
*काळे स्वाती(शिक्षक)अहमदनगर*

-
★ एक मे दिनी साजरा करुया
मिळूनी महाराष्ट्र दिन
वर्षभराच्या संघर्षाचा
निघून जाईल शिण....

               रचना
      श्रीम.शोभा सुरेश दळवी(शिक्षिका)
                 जि-बीड
           
★महाराष्ट्राची संस्कृती वैभवशाली
रत्ने घडली येथे दिव्य महान
सांस्कृतिक वारसा जपून
वाढवूया भारताची   शान
अनिता दाणे(शिक्षिका)
नांदेड
★महाराष्ट्राच्या  थोर  महात्म्यांची  परंपरा ,
संतांची वाणी पोहचे घराघरा ,
आम्हीच  आमुचे  भाग्यविधाते   परोपकारा  ,
इतिहास  , सण उत्सव, संस्कृतीची  जाण  लहानथोरा .||

सौ . सुनंदा  नरेंद्र  चौधरी .
वसई ,
★सुजलाम,सुफलाम करुया धरा
बनवण्यास प्रभावी राष्ट्र
प्रगतशील मग घडेल माझा
जय हिंद जय महाराष्ट्र

               रचना
      श्रीम.शोभा सुरेश दळवी(शिक्षिका)
                 जि-बीड

★कडेकपारी सह्यगिरीच्या घुमू लागले वारे,
जयगान गाती महाराष्ट्राचे,नभी सूर्य अन तारे!!
लावणी आमची शान अन पुरणपोळी ती महान
स्वराज्या रक्षणासाठी येथे लढले मावळे सारे !!

   *✍🏻डी एन ननुरे परभणी*
★महाराष्ट्र माझा

महाराष्ट्रात आज माझ्या
वाजतात सनई चौघडे
डफावर थाप टाकुनी
गाऊ कीर्तीचे पोवाडे

श्रीम- उषा बप्पासाहेब ढेरे,
        सह शिक्षिका
       प्रा शा सौंदना
         ता जि बीड
★माझ्या महाराष्ट्र भुमित दरवळे
गंध शौर्याचा अन सूर संतवचनाचा
राखण्या शान तोफेवर ठेऊ प्राण
जपण्या आदर्श शिवबाच्या संस्कृतीचा

सौ.अलका आ.धनकर,(शिक्षिका)
★ नसानसांत आमच्या खेळवितो आम्ही मराठी
महाराष्ट्राची लावणी ढोलकीवर गातो आम्ही मराठी
लाल मातीवरची मर्दानी कुस्ती खेळतो आम्ही मराठी
अभंगासह गवळणीही गातो भजनात आम्ही मराठी

श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
   शिक्षक जि.प.उस्मानाबाद.
★ 1मे दिनी काव्य स्फूरे माझ्या मनी
आंनदाचे उधान येते महाराष्ट दिनी
रचूया महाकाव्य सारे मिळूनी
महती मिळावी महाराष्टाची त्यातूनी........
..उज्वला कुलकर्णी (शिक्षिका)उस्मानाबाद
★महाराष्ट्राची संताची भूमी
समृद्ध आचरणाची शिकवण
विचारांचे प्रबोधन करून
केली नितीमूल्यांची रूजवण


अनिता दाणे(शिक्षिका)नांदेड
★ माझ्या महाराष्ट्राची महान महती
देती जगाला महान संस्कृती
महाराष्ट्र  माझा जन जन बोलती
अवघ्या सह्याद्रीत नाद गर्जती

छाया कांबळे (शिक्षिका)
लातूर
★ *महाराष्ट्राची ही पवित्र माती*
*विसरूनी सर्व जातीपाती*
गुंफूनी मानवतेची अतुट नाती
सुसंस्काराचे निंत्य गीत गाती.

अनिलकुमार कदम ,सातारा .
★ महाराष्ट्र पुण्यभूमी नमो नमः मी
महाराष्ट्र तिर्थक्षेत्र वंदीतो तुला मी.
तूच माझी माय, पुत्र तुझा मी
तुझ्यामुळे माझा जन्म,गुण गातो मी.

सीता टेकुलवार
  (शिक्षिका)
  गडचिरोली.
★ माझ्या या महाराष्ट्राच्या भुमित
जन्मले सारे विर पूरूष अन् स्त्रिया
सर्वांच्या कार्याची जाणिव ठेवत
संस्कारक्षम महाराष्ट्र घडवु या... !

- सिद्धार्थ सपकाळे ( शिक्षक )
इगतपूरी, नाशिक
★ इथेच नांदती अनेक धर्म जाती
विविध भाषाही इथेच बोलती
विविधतेत एकात्मता रंगती
तरी राहती एकजुटीने सारे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना --शिला अम्भुरे बिनगे
          परतुर जालना
★जगती  महाराष्ट्राचा  मान ,
गर्जतो  जयजयकार  होऊन  बेभान  ,
वैभवशाली  भूमी , गडकोट  किल्ले असे  शान ,
निती मुल्यांची  जाण ,जपे  संस्कृतीचे  भान .||

सौ . सुनंदा  चौधरी .
वसई
★ढोल,ढोलक,नगारा,शिंग
संबळ,किनरी,तारपा,पुंगी
किती छानछान वाद्ये ही
महाराष्ट्रातील आदिवासी  बांधवांची

मीनाक्षी काटकर
शिक्षिका यवतमाळ
★ देश हा शूर शिवबांचा
ही जिजाऊंची माती!
अनेकांनी जपल्या
इथल्या संस्कृती ज्योती !!

काव्यरचना-
सौ चारुशीला लक्ष्मीकांत धुमाळ
 शिक्षिका मुंबई
★कडेकपारीतून गर्जतो महाराष्ट्र माझा
तेथील भाषेत उत्सव परंपरेत नांदतो मी अभिमानी सर्जा
महाराष्ट्रातील संतांची अभंग-भारुडे
महिमा गण्यास शब्दही अपूरे पड़े
       
     कुलथे जया जगनाथ-(शिक्षक
          अहमदनगर
★ सह्याद्रीच्या कडेकपारीचा
घुमतो आवाज पराक्रमाचा
शिवरायआहे राजा आमुचा
जयजय झाला महाराष्ट्राचा

प्रमिलाताई सेनकुडे
हदगाव जिल्हा नांदेड.
★करू नगाऱ्यांचा गजर
धन्यवाद देऊनी शिवबाचे
फुले,शाहु व आंबेडकर
येथे मूल्य रूजे एकात्मतेचे

राजू बनसोडे सर
प्रा.शि. अहमदनगर.
★जय जय महाराष्ट्र हे जयगाण
गाण्या आम्हा वाटतो अभिमान !
मराठमोळी संकृती आमची
आहे मराठमोळा मान !

✍🏻डी एन ननुरे परभणी
★आंबा,शेकरु,हरियाल,ताम्हण
असती महाराष्ट्राची राज्य प्रतीके
पारंपारिक कला असे लावणी अन्
राज्यभाषा मराठी बोलती जन कौतुके

प्रतिभा नारायण बोबे,(शिक्षिका)
 अहमदनगर
★ रचले ओव्या अन् अभंग
दाखवी संस्कृतीचे रंग,
संस्कारात होई जो तो दंग
महाराष्ट्राचे दुमदुले सारंग..
.प्रियंका ढोले , अहमदनगर
★ संतानी दिला संस्कृतीचा वारसा
संत आहेत महाराष्ट्राचा आरसा
महाराष्ट्रदिनी गावू त्यांचे गान
रचूनी महाकाव्य वाढवू या शान
 रचना :अरूणा आगदिगे  शिक्षिका नांदेड
★ महाराष्ट्रात माझ्या कृष्णा, कोयना भिमा नद्यांची खान,
 कोकण किनारपट्टी वर सह्यद्री पर्वताची रांग
,महाबळेश्वरात पिके स्ट्रॉबेरी छान , 
शिवरायांची किर्ती सागरा परी अथांग.
सेो.दुधमल विजया किशोर(बगाटे)(शिक्षिका )हिंगोली .
★महाराष्ट्रात माझ्या कस्तुरीचा धुरळा I
स्वराज्यासाठी लढला तो शूर मावळा I
महाराष्ट्रात माझ्या सोन्याचे ऊन I
प्रिय आम्हा महाराष्ट्र प्राणांहून I

- हरिश्चंद्र खेंदाड .( शिक्षक )
वैराग, जि. सोलापूर .
★शूरांचा इतिहास आणि ,
लेखनीच शस्त्र आहे ॥
महाराष्ट्राच्या संस्कृतीला,
काव्याच वस्त्र आहे ॥

जालिंदर राऊत ( शिक्षक पिंपरी चिंचवड )
★महाराष्ट्राच्या मातीची
महती आहे मोलाची
ओळख हिंदवीस्वराज्याची
राजा छत्रपती शिवरायांची
गोरे शामल तुकाराम शिक्षीका लातूर🙏
★ देशभक्तीच्या अनंत ज्वाला
अनंत ह्रदयी, तेवत  ठेऊ
तेजोमय महाराष्ट्र भूमीला
हिमालयासम महान बनवू

 सौ. नीता दुर्गाडे, भुजबळ.
पुणे.
★काय  वर्णावी महाराष्ट्राची  महती
पावन भूमी ही आहे संतांची
मर्द मराठा झाला शिवबा येथे 
माणुसकिचीआणि पराक्रमाचीनाती
सुरेखा ठाकरे /ढोले यवतमाळ
★कितीतरी विविधता असे ही
महाराष्ट्रातील अन्नपदार्थात
जळगावात भरीत नाशकात मांडे
कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा खातात

मीनाक्षी काटकर शिक्षिका
यवतमाळ
★ महाराष्ट्र माझी पावन भूमी
अवघ्या कडेकपारीत गाजली
संत-महात्मे येथे नांदली
माणुसकीची शिकवण दिली
छाया कांबळे (शिक्षिका)
लातूर
★मराठी ही राजभाषा महाराष्ट्राची
कितीतरी बोलीभाषा या महाराष्ट्रात
कोकणात मालवणी विदर्भात व-हाडी
खानदेशात अहिराणी खानदेशी बोलतात

मीनाक्षी काटकर शिक्षिका
यवतमाळ
★ महाराष्ट्राचा इतिहास न्यारा
जातीपातीला कधी न थारा।
येथेच खानाला मिळाला हिसका
एकजूटीतून प्रेमाचा वाहे वारा

सुनिता वावधाने - नांदेड
★वेष आमचा कोसाकोसावर भाषा ही बदलते।
तरीही शाहू ,फुले ,आंबेडकरी बाणा अंगी  बाणवते।
कोकणाचा हापूस हि प्रिय अन नागपूरचे संत्रे।
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाहती माणुसकीचे झरे।
जयगाणं गाती महाराष्ट्राचे नाभी सूर्य अन तारे।।

बिनादेवी दरेकर
शिक्षिका,कासारवाडी,बार्शी
सोलापूर
★माझ्या महाराष्ट्राचे गाऊ गुणगाण
आहे तो भारताची शान
संत महात्म्याची खान
वाटतो आंम्हा त्याचा सार्थ अभिमान

गोवंदे मनोरमा, शिक्षिका , नांदेड.
★महाराष्ट्र भूमी संतांची
कवी,लेखक,विचारवंतांची
करूयात आदर,जपुयात शिकवण
हीच शान आपुल्या महाराष्ट्राची

श्रीम- उषा बप्पासाहेब ढेरे
        सह शिक्षिका
         प्रा शा सौंदना
           ता जि बीड
★महाराष्ट्र दिनी
मायबोलीची सांगू महती
आम्हा अमृताची अनुभूती
स्वर्गाहून सुंदर भासे माझी माती

कविता रमेशराव पुदाले नळदुर्ग
★महाराष्ट्र माझा मराठी भाषा माझी
अभिमान माझा स्वाभिमान माझा
सह्याद्रीचा डोंगर व पराक्रमांची ही भूमी माझी
शिवबा माझा  ज्ञानेश्वरी माझी तुकारामाची गाथा माझी


आशिष देशपांडे , अनसिंग, वाशिम.
★ इथेच जन्मले वीर पुरुष किती
घाव झेलले पोलादी छातीवरती
काळी माती तयांचे गान गाती
कीर्ती त्यांची आज आपण गाऊया रे।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना- शिला अम्भुरे बिनगे
         परतुर जालना
★विविध रंगढंगात पेरून शोभती ही माती
असले जरी धर्म वेगळे राबती माणुसनाती
दऱ्या खोऱ्या अन असंख्य शिखरे बनता वाती
निसर्गाचे सौंदर्य नांदती भारतीय ही संस्कृती
          विशाल धिवरे (नाशिक)
★महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेे कित्येक तेजस्वी सूर्य
शौर्य अन साहित्याने त्यांनी गाजविले अदभुत पर्व
अनमोल या संस्कृतीपुढे झुकती सानथोर सर्व
पुण्यवान महाराष्ट्र भूमीचा वाटे आम्हा गर्व

सौ.मिताली महेंद्र तांबे( शिक्षिका ) , मुंबई
★ सह्याद्रीच्या  कड्याकपारीतून
वाट जाते अवघड यातून
खुणवीतो निसर्ग राजन
एकदातरी घ्यावे दर्शन
सौ.विद्या येलमुलवार (स.शि) चंद्रपूर
★ शिवरायांपासून सचिनपर्यंतची लाभली रत्न,
महाराष्ट्र उभा आहे डौलानं
आपणही होऊ माणूस म्हणून रत्न
इतरांनाही ठेवु जगाया अभिमानानं.... !


- सिध्दार्थ सपकाळे ( प्राथ. शिक्षक )
इगतपूरी , नाशिक
★वैनगंगा, गोदावरीचा लाभला ज्याला संग आहे.
सातपुडा आणि सह्याद्री बाहु ज्याचे बलदंड आहे.
     विविध बोलीभाषा
    विविध वेशभूषा!
प्रणाम माझा त्रिवार
महाराष्ट्र देशा! !

    काव्यलेखन
प्रिति रामटेके /जगझाप  सह. शिक्षिका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर
★कणखर तो बाणा आमुचा
राष्ट्राची ती शान, 
 संस्कृती करी उपासना
महाराष्ट्राचा मान....
प्रियंका ढोले, अहमदनगर
★थोर महाराष्ट्राची संस्कृती
अफाट,अगाथ याची महती
पराक्रमाचे नगारे निनादती
समतेचे इथे वाहती वारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
★महाराष्ट्र माझा आहे
फुले,शाहू,आंबेडकरांचा
हिंदवी स्वराज स्थापन करून
रयतेला सुखी करणाऱ्या छत्रपतींचा

श्रीम- उषा बप्पासाहेब ढेरे
        सह शिक्षिका
         प्रा शा सौंदना
          ता जि बीड
★ महाराष्ट्राची संस्कृती  थोर जगी आहे  महान
ज्ञानतुक्याची संतभूमी अन वेरूळ अजिंठा शान
शिवरायांनी इथे स्थापिले हिंदवी स्वराज्य महान
मायानगरी मुंबई आमची साऱ्या जगाची शान.
          श्री.ज्ञानेश्वर कचरू गायके
           जि. औरंगाबाद
★ थोर साधु-संताची ,ही महाराष्ट्राची माती
महाराष्ट्र माझा ,याची प्राचीन संस्कृती
ज्ञानी ,तंत्रज्ञानी सारे ,महाराष्ट्राचे गुणगाती
शुर-विरांच्या आठवणीने मनात फुटती धुमारे ||

वर्षा येणुरे (स.शि) नांदेड.
★धोतर-फेटा,नऊवारी साडी
पुरणपोळी, ठेचा-भाकर खाऊ
विशिष्ट पोशाख, रूचकर खाद्यपदार्थ
लावणीचा ठसका महाराष्ट्रातच पाहू.
सौ.मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर
नळदुर्ग.
★ आमचा महाराष्ट्र देश  खूप महान,
हिंदू, ख्रिश्चन, सिख आणि मुसलमान,
जाती, धर्म, पंथ इथे एक समान,
आदराने आम्ही सर्व करतो याला प्रणाम
तबस्सूम झंडावाला-औरंगाबाद
★ ज्ञानोबा तुकोबांची ,ओव्या  अन् अभंगवाणी
साधूसंत सज्जनांची मायमाऊली,विठठ्लरुख्मिणी
शिवबा जिजाऊंची,मायमराठी गाते गाणी
शूरवीर क्रांतिकारकांचे ,हौतात्मय तुम्ही स्मरारे
यमुना  पहाडसिंग मोरे
प.शिक्षिका  भानखेड
जि.बुलडाणा
★ कृष्णा, कोयना अन् गोदामाई
पाण्याची त्यांच्या नितळ निळाई
आकाशाला भासतसे नवलाई
एकजुटीच्या घागरी मिळुनी भरुया रे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना --शिला अम्भुरे बिनगे
   परतुर जालना
★ याच भूमित निपजले वीर
दिले बलिदान आनंदाने
ठेवूनीे चरणी स्व शिर
मुंबई जोडली बहु धडाने

राजू बनसोडे सर
प्रा.शि.अहमदनगर
★एकमुखाने चला गावूया गुणगान
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र महान
भाग्यशाली आम्ही लेकरे संस्कृतीचं दान
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र छान....

मिनाक्षी नागराळे,वाशिम
शिक्षिका
★डोंगर दऱ्या, झुळूझुळू झरे
पक्षी पाखरे, वेली झाडे
महाराष्ट्राच्या उंचा शिरी,फडकत राहो अभिमान आमचा
 फडकत राहो अभिमान
सुनिल टोंगे सहा. शिक्षक, चंद्रपूर
★शिवबाच्या स्पर्शाने झाली, पावन इथली भूमी
रक्त सांडले आपुले वीरांनी, राष्ट्रहिताच्या कामी
जातीभेद हे विसरून जाऊ, ऐक्याचा तव मंत्र जपू रे
शिवबाचा मनी वसा जपुनी, जय गान गाऊ या सारे

 अश्विनी दिनेश साळुंखे. शिक्षिका, पुणे
★ सामूहिक काव्यनिर्मितीसाठी.

महाराष्ट्र भूमी संताची
त्याग शौर्याची महती.
दिल्लीचे तख्त राखतो
जगी  शिवबाची किर्ती.
फुले शाहू आंबेडकर
आमटे कळस सेवेचा.
जगात शिक्षणाचा डंका
 आहे शिक्षिका सावित्रीचा.


कुसूम ओंकार  चौधरी
प्राथमिक शिक्षिका
 जि. प. शाळा विखरण देवाचे
जि. धुळे



कुसूम चौधरी
प्राथमिक शिक्षिका धुळे.
★सांडिले रक्त,त्या महान वीरांनी
जन्म तयाचा पुन्हा या भूमीवरी व्हावा
प्राणांची आहुती,दिली त्या शूरांनी
आसमंती जयजयकार आता महाराष्ट्र माझा

आरती कोरडकर( शिक्षक )
अहमदनगर
★संतभूमी ही तुकोबा ,ज्ञानोबाची
सह्याद्रीच्या द-या खो-यातूनी
गर्जे शिवबाची शौर्य गाथा
जपू वारसा सारा मनातूनी

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे.
★ राकट हा देश आहे पवित्र इथली माती
गुण्यागोविंदाने नांदती अठरापगड जाती
कृषिप्रधान देश ही तर आमची ख्याती
विकासाचे जयगाण घुमवी दिशादिशातून नगारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे !!

       शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                   बीड
★जात्यावरची ओवी गाते बहिणाबाई
ज्ञानदेवाची ताटी उघडते मुक्ताबाई
विठूराया चरणी लीन होते जनाबाई
स्त्री पूज्य सावित्रीची ओवी गाऊया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★महाराष्ट्राच्या आरतीसाठी
आणिन तारे चंद्र
महाराष्ट्राचे वैभव पाहून
लाजेलही स्वर्गिचा इंद्र


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★ माझ्या महाराष्ट्राचा
अटकेपार गेला झेंडा
अर्थ नीतीमान राजा
जिजाऊचा शिवबा गुंडा

  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★ सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो निनाद
अनेकतेत एक तू यात नाही विवाद
महाराष्ट्र माझा साधे प्रत्येकाशी संवाद
युपी, यमपी, अवघ्यांचे तव चरणी वाहते वारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

उषा सचिन खोपडे
महाड जिल्हा_रायगड
मुख्याध्यापक, कवी, लेखक
★माझ्या महाराष्ट्रात विविध जाती पंथ
पवित्र करुनी गेले थोर संत महंत
वेषभुषेच्या संस्कृतीतही वैविध्य पुरे
महाराष्ट्रा सामावुनी घेई कोणी न ऊरे!...

कडे कपारी.....अन् तारे

सौ.रोहिणी अशोक गंधेवार
(कवीयत्री...)अकोला
★भगवा फडकला गगणी
केले केसरी क्षितीज
ताकद याच्यात शिवबाची
नमले इथे बलाढ्य गज

सौ.अलका आ.धनकर(शिक्षिका)
वाशिम.
★जय जय महाराष्ट्र माझा
म्हणून गाऊया गुणगान
आलेच संकट त्याच्यावर जर
तर देऊया बलीदान


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★दऱ्याखोऱ्यातुनी , गिरीशिखरावरती ,
    पराक्रमाचे  घुमू  लागले  नगारे  !
विभिन्न  भाषा  नि  वेशभूषा , अनेक पंथ
     वाजू  लागले संस्कृतीचे  नगारे !
  आध्यात्मिकता , रुढी अन  परंपरा .
   संत महंतांची  कीर्तीरुपी  गुढी  उभारे !
गौरवगान  महाराष्ट्राचे  अभिमानाने  गाऊ  सारे ,
जयगान  गाती  महाराष्ट्राचे नभी  अनोखे  सूर्य  अन  तारे - - - - -

सौ . सुनंदा  नरेंद्र  चौधरी
वसई  . पालघर
★ चांदा ते बांदा महाराष्ट्र माझा                 
          भीती न आम्हा सह्याद्रिच्या पुञा             
         छञपती,फुले,शाहू,भिमाईच्या भिवा               
       सर्वधर्म समभाव जपतो महाराष्ट्र माझा     
        कमलाकर मेश्राम शिक्षक भद्रावती चंद्रपूर
★महाराष्ट्राची शेती उदरनिर्वाहाची जननी
घाम गाळूनिया पिकवी पिक पानी
माझा महाराष्ट्र म्हणजे शेतीची खाण
कष्ट करूनी पिकवी सोन्याचे रान
कुलथे जया जगन्नाथ(शिक्षिका)
   अहमदनगर
★माझ्या महाराष्ट्राचे हो
रूप बोलीभाषेन नटलं
कानाकोपऱ्या जगात
तिनं दुकान थाटलं
  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★महाराष्ट्राच्या भुमीत जन्मले शाहू ,फुले,आंबेडकर
शाहू महाराजांनी पहिले  पद केले गीरदावार
फुल्यांनी शाळा काढून शिकविले पोर
आंबेडकर साहेबांनी घटना लिहून केले उपकार ..

शिवाजी नामपल्ले  मा.शिक्षक
अहमदपूर जि.लातूर
★शूर-वीरांची नररत्नांची खाण 
इथे जन्मले मुत्सद्दी विद्वान
दिशातुनी घुमते तुझे गाण
महाराष्ट्र महान हाच अभिमान

सौ.वासंती अनिल कोदांडे (शिक्षिका)
        सांगली
★महाराष्ट्र माझा नांदो
येथे एकोपा
घडो देशात नंबर
एक सलोखा
भारती सैंदाणे - जळगाव
★महाराष्ट्राच्या परंपरेचा
पुढे चालवू वारसा
मी मराठी मी मराठी
मनी उमठला ठसा


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★ महाराष्ट्राचा जन्मदिवस आज
त्याला उपस्थिती कवी,कवयत्रीची
आणला केक काव्याचा
शुभेच्छा देती महती त्या शब्दाची

सुरज अंगुले उस्मानाबाद
पत्रकार
★इतिहास उत्तुंग शतकांचा लाभला तुला
परि अभंग, अविट अवतार पुन्हा लाभला
१मे १९६० ला जन्म तुझा रे झाला
तुझ वाढदिनाच्या शुभेच्छा देतो शतदा रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

उषा सचिन खोपडे
महाड जिल्हा_रायगड
मुख्याध्यापक, कवी, लेखक
★ या भुमीला छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा वारसा
संतांनी दिला दया परोपकाराचा वसा
शाहु फुले आंबावडेकरांनी नांदवली समता गावकुसा
त्यांच्या कार्याची धुरा झेलु या रे

रोहिणी गायकवाड सटाणा नाशिक
★ जाहले रणयुद्ध महाराष्ट्र भू -साठी
कुणी भाला ,समशेर घेऊन हाती
छातीत झेलून वार आम्ही
माथी टिळक लावली पवित्र माती

सौ.अलका आ.धनकर
शिक्षिका
ता.जि.वाशिम
★जगप्रसिध्द लेण्या अन् जोर्तिलिंगाचे स्थान,
देवताला ही आवडलेली
महाराष्ट्राची भूमी महान...

प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
★ महाराष्ट्र माझा संत ,लढवय्ये शास्त्रज्ञांचा
महिमा गाजला जगी हो  तयांचा
ज्याचा मनी आमच्या ठसा आहे हो कायमचा
चला करू या जयजयकार ,आपल्या महाराष्ट्राचा
स्मिता लहू नवघरे.(शिक्षिका)
     महाड- रायगड.
★महाराष्ट्राच्या लोककला, आहेच मुळी भारी
लावणी,पोवाडा,गवळण,गोंधळाची ऐटच न्यारी
श्रवण करूनि होती तल्लीन , विश्वमंडळे सारी
संस्कृती लोककलेची, जतन करू या रे
जयगान गाती
महाराष्ट्राचे,नभी सूर्य अन तारे

शालिनी रोहित मेखा(संगीत शिक्षिका)
मुंबई
★माझ्या महाराष्ट्राची माती
धान्यमोत्याची  हो खाण
भरभरून उधळिते
संस्कृतीचे हरेक वाण

  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★ माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत रे
पिकांसह माणसं अंकुरतात
संतांपासून सैनिकांपर्यत
रोजच नव्याने मानाचेतुरे रोवतात.
     श्रीम. लाहोर आर. बी. कें. प्र. पेंडगाव  बीड.
★जय जयकार महाराष्ट्राचा,
करते मी आज,
विविधतेने नटलेल्या परंपरेचा,
चढवला हा साज.


धनश्री गांगुर्डे,नाशिक
★ सह्याद्रीचा कडा गर्जतो
जय शंभू राजा
मनामनात एकच नाद
महाराष्ट्र माझा


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
महाराष्ट्राच्या मातीवरती
जन्मल्या या क्रांतीज्योती
शिक्षण समईत ज्ञानवाती
पाजळूनी केली समाज प्रगती
गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर.
★महिमा तुझा दाही दिशात
चार ओळीत कसा मांडावा ।
एकच मागणे त्या देवाला
जन्म पुन्हा माझ्या महाराष्ट्रातच व्हावा।
अनिल वाघ.प्राथमिक शिक्षक नाशिक .
★नदी गाते कृष्णा-इंद्रायणी शौर्याची गाथा l
संतांच्या या पवित्र भूमीला धन्य होई माथा ll
शिवरायांचा, संस्कृतीचा, धर्म एकासाचा l
समृद्धीने बहरलेला, महाराष्ट्र आमुचा ll

सौ. हेमलता संतोष देशमुख
महाड - रायगड.
★नवजीवन फुलवी,अस्सल येथील माती
कणखर बाणा,जपे माणुसकीची नाती
न्यारी परंपरा,देशात असे मराठी ख्याती
अंगावर आणती काटे,महाराष्ट्र क्रांतीचे अंगारे
जयगान गाती महाराष्ट्राचे,नभी सूर्य अन् तारे...

वृषाली खाड्ये,मुंबई
★निराळे रंग निराळी भाषा
वसे फक्त माझ्या महाराष्ट्रात
एकत्र खाद्यसंस्कृती आणी वेगळ्या वेशभूषा
दिसती फक्त माझ्या
महाराष्ट्रात
सुषमा सहस्त्रबुध्दे
प्रतिनिधी ठाणे
★'माझा महाराष्ट्र ' उच्चारताना
ऊर माझा भरून येतो
इथली संस्कृती गाताना
सुरांनाही पूर येतो ....
✍अनुराधा देवळे
शिक्षिका
उस्मानाबाद
★ महाराष्ट्राचे गीत लिहीतो घेउन लेखणी हाती
लाल तांबडी काळी आहे इथली आमची माती
पण येथेच येते आम्हांला बंधुतेची अनुभुती
हेच गीत आनंदाने  आपण सारे गाउ या रे
जय गान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे
कामथे ज्ञानेश्वर प्रभाकर(शिक्षक)जि.पुणे.
★ महाराष्ट्र आहे माझी शान
मला त्याचा खुप अभिमान
प्रत्येकाचा इथे आहे सन्मान
सर्वजण गातात महाराष्ट्राचे गुणगाण
श्रीम .सुवर्णलता गायकवाड (शिक्षिका) अहमदनगर
★महाराष्ट्र माझा वैकुंठ माहेर !
विश्वाला जणू संस्कृतीचा आहेर !
महाराष्ट्र माझा अत्तराचा दिवा !
जगाने पाहिला शूरवीर शिवा !
_ हरिश्चंद्र खेंदाड, ( शिक्षक)
वैराग, जि. सोलापूर
★: माय मराठी मातीला,
भाव भक्तीचा मृदगंध!
ज्ञाना-तुकयाने दिला,
मानवतेचा धुंद सुगंध !!
श्री बाळासाहेब शिंगोटे
★तेवत ठेऊ अखंड इथे
पुरोगामी विचारांच्या ज्योती
सहिष्णुतेने अन विवेकाने
जाळून टाकू अंधश्रध्देच्या वाती.

अनिलकुमार कदम ,सातारा
★संतांची शिकवण मिळते या मातीतून
निसर्गाची महती कळते या सणांतून
प्राणीमात्रांचा पोळाही इथेच होता साजरा रे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र सारे।।

शिला अम्भुरे बिनगे
परतुर जालना
★: महाराष्ट्राची किर्ती महान
विजयगीत गाती थोर सान
निसर्गाने दिलंय समृद्धीचं दान
देतो आम्ही समतेचे नारे
गुणगान गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
शिक्षिका
★आमचा महाराष्ट्र देश  खूप महान,
हिंदू, ख्रिश्चन, सिख आणि मुसलमान,
जाती, धर्म, पंथ इथे एक समान,
आदराने आम्ही सर्व करतो याला प्रणाम
तबस्सूम झंडावाला-औरंगाबाद
★गोदा,कृष्णा ,चंद्रभागा, इंद्रायणीचे स्थान तू
झाशीच्या राणीपरी रणरागिणींची भूमी तू
जनाई,मुक्ताई, सावित्रीमाई, डॉ.आनंदीबाई
जिजाऊ, रमाई यासारख्या लेकींची भूमी तू.

सौ.मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर
-तुळजापूर(शिक्षिका)
★: माझ्या महाराष्ट्राची महती किती वर्णू रे
येथे नांदती सर्वधर्मभावाने रे
शिवरायांचा आम्हांस असे अभिमान रे
तिन्ही लोकी वाजे पराक्रमचा डंका रे
  सौ.स्वाती दौलत किरवे.
    वाई,जि.सातारा

भज्जी भाकरी अन् ठेचा
हाच शेतकर्‍याचा खास पिझ्झा
खिचडा आंबिल मठ्ठा  खास
लातुरकर साजरी करती वेळअमावशा झक्कास

सौ मनिषा धनराज जाधव (माने)
वाशीम

★ सावित्रीच्या लेखणीला
इथेच धार आली
माँ जिजाऊंचे पोवाडे
दाही दिशा घुमली

उषा बप्पासाहेब ढेरे
सह शिक्षिका
प्रा शा सौंदना
ता जि बीड
★महाराष्ट्र

महाराष्ट्राला म्हणतात संतांची भूमी
कोणी म्हणे नररत्नाची खाण
शिवबासारखे वीरपुरुषजन्मले या भूमी
नाही ओ इथे कशालाच वाण

श्रीमती साईली राणे,ठाणे
★ प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न
गुरूजीने प्रत्यक्षात उतरविले
प्रगत महाराष्ट्राचा साज लावून
विद्यार्थी प्रगत घडविले....

मिनाक्षी नागराळे,वाशिम
शिक्षिका,कवयित्री
★ शेतक-याच्या घामान महाराष्ट्र होईल सुजलाम सफलाम
शेतकरी राजाला करते सलाम
पिकवून सोन करीतो खूप काम...

मिनाक्षी नागराळे,वाशिम
शिक्षिका,कवयित्री
★ ज्ञानोबा ,तुकोबा ,मुक्ताई ,जनाई
थोर साधु-संताची ही महाराष्ट्र भुमी
विठ्ठलाचे वारकरी ,पायी वार्या करी
महाराष्ट्राचे गुणगाती भान विसरूनी सारे..

वर्षा येणुरे (स.शि)नांदेड..




★विविध जाती धमॆ येथे , दिसून येई एकता ,
कोणताच भेद नाही  , सदैव वसे समानता,
हाक येता मदतीसाठी, जागृत असे  बंधूता,
अशीच राहो ,माझ्या महाराष्टाची अखंडता
नंदा परदेशी- धुळे.
★शुर विरांच्या या मातीने गायल्या किती गाथा
या भुमिस विनम्र होतो आज माझा माथा
दुमदुमतात जगती अवघ्या माझ्या महाराष्ट्राच्या कथा
रक्तातुन उसळे प्रत्येकाच्या पराक्रमाचे अंगारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

उषा सचिन खोपडे__महाड जिल्हा_रायगड (मुख्याध्यापक) कवयित्री, लेखिका
★महाराष्ट्राच्या भूमीवरती
लढले छत्रपती
प्रत्येकाला ठाऊक आहे
महाराष्ट्राची कीर्ती
त्या किर्तीला वंदन करूनी
विजयी ध्वज हाती घेऊ या रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे
★शिवरायांची शिवनेरी
तुकारामांची गाथा
ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
 ठेवू त्यावर माथा

श्री.राजू बनसोडे सर
प्रा.शि.अहमदनगर
९४०४६९६१४३
★जिजाऊंचा शिवबा इथेच घडला
सावित्रीनेही अक्षरधडा गिरविला
क्रांतिसुर्य ज्योतिबा इथे तळपला
या मातीतच शिक्षण घेऊया रे ।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना -शिला अम्भुरे बिनगे
परतुर जालना
★महाराष्ट्राच्या भूमीवरती
लढले छत्रपती
प्रत्येकाला ठाऊक आहे
महाराष्ट्राची कीर्ती
त्या किर्तीला वंदन करूनी
विजयी ध्वज हाती घेऊ या रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे
        अंजु जोशी बीड
★ 'महान राष्ट्र'असा महाराष्ट्राचाअर्थ
इथे कोणात  दिसत नाही स्वार्थ
बलिदान नाही गेला कोणाचा व्यर्थ.
म्हणूनच म्हणते महाराष्ट्र पुण्यतिर्थ.

सीता टेकुलवार
 (शिक्षिका)
    गडचिरोली.
★वेरुळ अजिंठा असे महाराष्ट्राची शान

गड किल्यांचा आम्हा सार्थ अभिमान

जपूया संस्कृती ऋषिमुनींची

अन उंचावू महाराष्ट्राची मान.

राजेंद्र महाजन वेरुळ औरंगाबाद
 ★संतांची भूमी
महाराष्ट्र माझा
पंढरीची वारी
महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे
★ इतिहासाचा साक्षीदार
सगळ्या देशाचा आधार
इथे नाही कुणी निराधार
महाराष्ट्राची मान उंचाऊ या रे
गुणगान गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
शिक्षिका
★ या भूमीच्या पावन मातीत जन्मला शिवबा
जनकल्याणा अवतरले ज्ञानदेव तुकोबा
भाळी लेवून माती गाजला तो खाशाबा
स्त्री शिक्षणाचे उद्गाते सावित्रीसह ज्योतीबा


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★माझा महाराष्ट्र उत्तुंग गिरीशिखरांचा  ।।
कणखर,पोलादी शूरवीरांचा  ।।
अध्यात्मिक अस्मिता जपणाऱ्यांचा  ।।
फुले, शाहू, आंबेडकरांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्यांचा  ।।

सौ मनीषा पवनारकर, रायगड
★वेगवेगळी इथली माती
एकच आहे भूमी
जात,पंथ नि धर्म वेगळे
परी एकच आहोत आम्ही

उषा बप्पासाहेब ढेरे
 सह शिक्षिका
बीड
★छत्रपती शिवरायांची जन्मभूमी,
फुले ,शाहू आंबेडकरांची कर्मभूमी।
तूच आमुची माता,
तूच आमुची अन्नदाता।
आम्हा असे तुझा अभिमान,
महाराष्ट्र भू ला असो माझे वंदन।
लीना पोटे ,सातारा
★ जिजाऊची अंगाई
महाराष्ट्र माझा
शिवबाची तलवार
महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे
★महाराष्ट्राला लाभली संताची पंरपरा

सावित्रीने वाहीली शिक्षणाची धुरा

संविधानावर चालतोय महाराष्ट्र सारा

हुतात्म्यांना मनोमन वंदन करा
गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर🙏
★शिव-शंभूचा सांगतो वारसा,
उरी अभिमानाची ज्वाला!
माता अन मातीसाठी,
देह महाराष्ट्रास अर्पिला!!
-श्री बाळासाहेब शिंगोटे
★सावित्रीच्या लेकींचा
महाराष्ट्र माझा
तुकोबांच्या गाथेचा
महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे.
★महाराष्ट्रात माझ्या अठरा पगड जाती ।
विविध वेशभूषा नाना भाषा संस्कृती ।
थोर परंपरा ही महात्म्यांची ऐतिहासिक वारसा जपती।
सण -उत्सवाचे गीत गाऊनी धुंद  होऊ सारे ।
जयगान गाती महाराष्ट्राची नभी सूर्य अन् तारे ।

बगाटे विजया (दुधमल),शिक्षिका,
हिंगोली .
★माणूसकीच्या झ-यांचा
महाराष्ट्र माझा
संस्कारांच्या मातीचा
महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे.
★माझा ग महाराष्ट्र
नर रत्नाची खाण
शिवा, आंबेडकर, फुले.
यांना जगती मान.

श्रीमती मुन्ना बापुराव देशमुख (जळगाव)
★भारताचे प्रवेशद्वार  माझी मुंबई  जणू  राणी।
भारताची गानकोकीळा लताताईंची मधूर गाणी।
क्रिकेटपटू धूरंधर सचिन   महाराष्ट्रच यांची मायभूमी।
साई- गजाननाचे पदस्पर्शाने ,ही
भूमी दुमदुमकारे।
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य  अन् तारे।।

यमुना  पहाडसिंग मोरे
पदविधर शिक्षिका
जि. प. शाळा भानखेड
जि. बुलडाणा
★ महाराष्ट्र माझा नररत्नांची खाण,
देशासाठी अर्पितो आपूली जान,
शाहू फुले आंबेडकर माझ्या
महाराष्ट्राच्या मातीचे प्राण.

अजित जाधव
 सातारा
★ महाराष्ट्र ही संताची
थोर महात्माजी
विविध  कला गुणांची
हि खरी ओळख  महाराष्ट्राची.

    शिवाजी नामपल्ले अहमदपूर
जि.लातूर
★छत्रपती शिवराय ,शंभूराजे, राजारामाचां, महाराष्ट्र

माॅ. जिजाऊ ,ताराबाई,येसुबाईचां महाराष्ट्र

रानडे, टिळक ,आगरकरांचा महाराष्ट्र

महात्मा फुले,राजर्षि शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र

श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
  शिक्षक जि.प.उस्मानाबाद.
★निसर्ग लावण्याने नटले सजले     मराठमोळे रूप सारे
महाराष्ट्राच्या जयघोषाने 
सुटले उत्सव अन् उत्साहाचे वारे।।
शूरवीर अन् साधूसंत ‌ शोभे जणू  मस्तकी मुकूटातील हिरे।
चला गाऊया पराक्रमाच्या गाथा आपण सारे।।

श्रीम•खडके दीपमाला सोमनाथ
  Tq.Tuljapur
Dist.Osmanabad
★दिव्यत्वाने इथे उजळली,
अभिमानाची लेणी.....!
साधू-संत व नरवीरांनी,
गायिली मांगल्याची गाणी..!!
-श्री बाळासाहेब शिंगोटे

★लातुरात मिळते ज्ञानतीर्थ
सिंदखेडी आहे मातृतीर्थ
संतांची शिकवण 'करा परमार्थ'
यामुळेच महाराष्ट्र भुमी झाली सार्थ


मनिषा माने(जाधव) शिक्षीका
वाशीम

★वेरूळ अजिंठा लेण्यांचा
मिरवतोय महाराष्ट्र माझा
अंदोलक हुतात्म्यांचा सदा
इथे होतोय गाजावाजा

शामल तुकारामगोरे
शिक्षिका लातूर
★ इंद्रायणी, गोदा, तापीच्या
काठचा महाराष्ट्र माझा
सह्याद्री, मेळघाटाच्या कणखरतेचा महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे.
★नको देऊ मला एसटी मध्ये जन्म !

नको देऊ मला ओपन मध्ये जन्म !!

जन्म दयाचं असेल तर महाराष्ट्रा  दे !!!

जन्म दयाचं असेल तर भारतीय म्हणुन दे.!!!!

प्रकाश ढोबळे (औरंगाबाद/नागपुर)
★ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी पसायदा
तुकोबांच्या अभंगांचे वरदान
जना -मुक्तांच्या ओव्यांचा सन्मान
होतोया त्रिभुवनात सदासर्वदा रे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना -शिला अम्भुरे बिनगे
परतुर जालना
★भाषा आमुची मायबोली
असे ती गोड लाजरी मराठी,
महाराष्ट्राचे जयगान गातो
राखतो शान आम्ही मराठी..!!

प्रणाली कदम, मुंबई
★नेसूनि पैठणी नि हिरवा चुडा  !
कोल्हापुरी साज तनुवरी  !
पुरण पोळी तांबडा रसा !
मराठमोळया संस्कृतीचा वारसा !
वंदना आलमद ( शिक्षिका )
उस्मानाबाद
★सण,उत्सव साजरे होतात थाटात
 रांगड्या माझ्या महाराष्ट्र भूमीत
अभिमान,गर्व आहे मला
जन्मले इथल्या पावन मातीत

श्रीम-उषा बप्पासाहेब ढेरे
        सह शिक्षिका
         बीड
★भारताचा इतिहास माझ्या
महाराष्ट्राने सुवर्णाक्षरांनी लिहिला,
देश स्वातंत्र्यासाठी अभिषेक
आपल्या रक्तानेही केला.

अजित जाधव
सातारा
★जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
मी गाते गुणगान
महाराष्ट्र अमुची शान
तोच अमुचा सन्मान

 आरती लटपटे , परभणी
★ महाराष्ट्र माझी शान
जपतो गडकिल्ले
शौयाचा वारसदारदार आम्ही
मनस्वी फुले वाहिले!!!

सुरज अंगुले
उस्मानाबाद
★शाहू, टिळक, आंबेडकर इथे जन्मले लाल
स्वातंत्र्यासाठी त्यांनी किती भोगिले हाल
विभूतींचे बलिदान,झाला सोनेरी उषःकाल
महाराष्ट्रासाठी उजाडले एकोणवीसशे साठ साल


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका )- अकोला
★महाराष्ट्र मातीने पोसले
तुकड्या गाडगे भीवा शीवा
स्वाभिमान संस्कार सिंचूनी
जागविले मुर्दाडल्या जीवा/

विजय बिंदोड
मुख्याध्यापक न.प.म.शाळा
पांढरकवडा
★दगड झालो तरी गडकोट
किल्याचा, सह्याद्रीचा व्हयचय,
मेलो तरी पुन्हा महाराष्ट्राच्या
मातीतच जन्मायचय.


अजित जाधव
मर्ढे सातारा
★ समृद्धीचा हा देश, वाहती गोदा भीमा ताप्ती
कुठे लाल अन कुठे काळी, पावन इथली माती
गड कोट किल्ले, शान मराठी राखती
विविधतेनुही या घुमती, एकतेचे नगारे!!

आशा पाटील, बुलढाणा
★ हे विश्वचीं माझे घर,
ज्ञानरायाचा जागर....!
पुण्यभू महाराष्ट्र माझा,
थोर संस्कृतीचे आगर....!!
-श्री बाळासाहेब शिंगोटे
★ थोर पूढारी,साधूसंतांची ही मराठी माती,
शेतकऱ्यांच्या घामाने फुलली इथली शेती,
जगात कुठेच दिसत नाही अशी महान संस्क्रुती,
चला जपूया हाच वारसा एक होवूनी सारे!!
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे||

  रुपाली काळे-घोरे.अकोला.
★चंद्रभागेच्या तिरी ।
वसली पंढरीची नगरी।
गोडवे गात पंढरपुरी।
चालले  चालले वारकरी।

अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
लेखिका/ कवयित्री
भंडारा
★कविता गाई बहिणाई
ओव्या गाते जनाई
संथ वाहते  कृष्णामाई
सर्व जगतास जीवन देई

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★नररत्नांची आमची भूमी
नजर वाकडी करु नका कुणी
शत्रूला कितीदा पाजले पाणी
अन्यायाविरुद्ध पेटून उठू सारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
★महाराष्ट्र माझा असे गोजिरा
भारताचा शोभतो जसा हीरा
गौरवगाथा त्याची गावया
हे महाकाव्य आपण रचूया रे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना -शिला अम्भुरे बिनगे
       परतुर जालना
★उत्सवांच्या ठायी गरजे ढोल नि ताशा...
अमृतातेही पैजा जिंके माझी ज्ञान मराठी भाषा...
मिळेलच रे दर्जा तुझं अभिजाततेचा...
अभिमान तुझा रे मजं महाराष्ट्र देशा!
- संतोष ग्यानिदास गेडाम
(विद्याव्यासंगी सहायक - मराठी विश्वकोश कार्यालय, वाई.) यवतमाळ
★महाराष्ट्राच सुख दुःख
जनाईच्या जात्यावर दळत,
इथल्या माणसाच काळीज
एकमेकासाठी पिळत.

अजित जाधव
सातार
★ एक मे दिनी झाली तव निर्मिती
आमची पोलादासम छाती
नाही  आम्हा कुणाची भिती
जगतात पसरली महाराष्ट्राची ख्याती.
सौ. छाया गायकवाड.
      मुख्याध्यापिका-पुणे
★चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल उभा विटेवर
हात ठेवूनी कटेवर
नजर साऱ्या महाराष्द्रावर

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर

★नउवारी काष्ट्यावर
शोभे नथ अन् आंबाडा खास
सौंदर्याने बहरला
महाराष्ट्राचा ईतिहास

मनिषा माने(जाधव)  शिक्षीका
वाशीम

★दरवळे मातीचा सुगंध
महाराष्ट्र जगाची शान
मातृभाषा आवडते मज
मराठीला सर्वदूर मान

उमा पाटील
धुळे.
★कुंकवाचा टिळा शोभे, या लक्ष्मीच्या  भाळी
चटणी भाकरी लोणची ,सणासुदीला खीरपुरणपोळी
जत्राउत्सव गावोगावी,  सण पोळा दिवाळी।
करती संस्कृतीचेे जतन, साजरे करून उत्सव सारे ।
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य  अन्यथा तारे।।
यमुना पहाडसिंग  मोरे
पदविधर शिक्षिका भानखेड
 जि .बुलडाणा
★माझ्या महाराष्ट्राची माती
जपूया माणुसकीची नाती
हीच अपुली संस्कृती
तरच होईल अपुली प्रगती
 आरती लटपटे , परभणी
★ संतांच्या भुमीने  महाराष्ट्र गर्जला
देवुनी शिकवण जनसमाज घडवला
भीमा कृष्णा गोदावरीचे पिऊनी पाणी
महाराष्ट्र माईची लेकरे गाती मंजुळ गाणी
 कुलथे जया जगन्नाथ (शिक्षिका)
         अहमदनगर
★केले वीरांनी बलिदान
वाढवली महाराष्ट्राची शान
याचे ठेवा जरा भान
वाजू द्या विकासाचे नगारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
★ कणखर तु दगडाचा तु
शुरांचा तु वीरांचा तु
शिवरायांचा तु मावळयांचातु
रयतेचा तु तसाच आमचा तु

सुषमा सहस्त्रबुध्दे
बालसंस्कार प्रतिनिधी ठाणे
★सात कल्पाचे बेट
शोभे राजधानी थेट
मुंबई वाटे ग्रेट
शोभे नट नट्यांची वाट।

अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
लेखिका/ कवयित्री
भंडारा
★विविध रंगी विविध ढंगी
महाराष्ट्र माझा
अष्टकला अष्टभूजांचा
महाराष्ट्र माझा

सौ. सुहासिनी सुरेश. पुणे.
★माझ्या काळ्या माईची
लेकराला मिळे साथ,
हिमालयाच्या मदतीला
माझ्या सह्याद्रीचा हात.

अजित जाधव
सातारा
★महाराष्ट्राच्या मातीला गंध पराक्रमाचा ,
इथल्या मातीचा नाद अभंगाचा ,
आमुचा असे इतिहास बलिदानाचा ,
भाळी लावावा टीळा या मातीचा ।

महादेव आवारे ( उपसंंपादक तथा प्रकाशक ), सोलापूर
★महाराष्ट्र माझी शान
हा सार्थ अभिमान !

आहे विविधता
दिसे एकरूपता!

श्रीमती-कुळधरण एस.एस. कोपरगाव जि.अहमदनगर
★ महाराष्ट्राची संस्कृती आपली..
स्वाभिमानानं जोपासूया,
वाईट प्रवृत्तीला आता सर्वांनी..
विकृती सोबत दूर ठेवूया.

✒ विक्रांत लाळे - मुंबई
★: भीमा,गोदा आणि क्रृष्णा,
महाराष्ट्राच्या जीवनदायिनी,,
आळंदी, देहू नि पंढरी,
वैष्णवांच्या श्रद्धास्थानी !!
-श्री बाळासाहेब शिंगोटे
★: संतांची पावनभुमी महाराष्ट्र धरणी।
भारताची शिरोमणी महाराष्ट्र धरणी।
समृध्दीची खाण महाराष्ट्र धरणी।
विरांचे गाई शौर्यगान महाराष्ट्र धरणी।

अस्मिता मेश्राम- पुष्पांजली
लेखिका कवयित्री
भंडारा
★देशाची आर्थिक राजधानीतु
सर्वसामान्यांचेआशास्थान तु
गणरायाचि पुण्यभूमी तु
संत मांदियाळी अग्रक्रमी तु

सुषमा सहस्त्रबुध्दे
प्रतिनिधी ठाणे
★: सावता ,चोखा, गोरा कुंभार
ख्याती यांची महाराष्ट्रभर
किर्तन करी, भक्तिचा जागर
इथे झाला संतवाणीचा प्रचार

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★ परस्त्रीला मानून माता
रचल्या विजयाच्या गाथा
राजांपुढेे झुकतो माथा
गनिमही भितीने थरथरे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
★शिक्षणात तंत्रज्ञानातअग्रेसर तु
लढवय्या मराठयांची मात्रुभुमी तु
सर्व प्रांतीयांना सर्वसमावेशक तु कलासाहीत्यात अग्रणी तु

सुषमा सहस्त्रबुध्दे
प्रतिनिधी ठाणे
★ओलावीत धावती शेतीला
तापी  भीमा कृष्णा गोदावरी
सह्यांद्रीचे चरण चुंबीती
अरबीच्या जीवन लहरी /

विजय बिंदोड.मुख्याध्यापक
न.प.म.शाळा-3 पांढरकवडा
★: महान असे राष्ट्र आपुले
शुर वीर लढवैय्यांची भूमी
या मायभूपुढे मस्तक नमले
दिनदुबळयांचा महाराष्ट्र स्वामी
सौ. अंजली गोडसे ( शिक्षिका)
सातारा
★शाहू ,फुले, आंबेडकराची भूमी
विचाराचं संतोष दाटला मनोमनी
महाराष्ट्राची भव्यदिव्य ख्याती
वास्तव माडण्यास दयावे अनुमती

सुरज अंगुले,उस्मानाबाद
(पत्रकार,साहित्यिक जिल्हा अध्यक्ष उस्मानाबाद)
★महाराष्ट्र स्वामिनी आई तुळजाई
विटेवरी उभी जगाची विठू-माई
निळाई च लेणं ल्याली संथकृष्णाई
जन्मले इथे मी,हीच माझी पुण्याई
✍अनुराधा देवळे
शिक्षिका,उस्मानाबाद
★देश अमुचा शिवबाचा
झाशीवल्या रणरागिनींचा
डफ तुणतुन्यावर शाहीर करतो गुण गाणं
देशातच अवघा माझा महाराष्ट्र माझा महान
घोडके जयश्री उस्मानाबाद
★शूरवीरांची ही  महती
पावन झाली इथली माती
जागोनी कित्येक राती
शस्त्र घेऊनी हाती.

सौ. छाया गायकवाड.
मुख्याध्यापिका -  पुणे
★संतविचारांचे,शूरांचे,
अखंड वाहती ज्ञानाचे वारे ॥
जयगाण गाती महाराष्ट्राचे,
 नभी, सूर्य -चंद्र -तारे ॥
-जालिंदर राऊत ( शिक्षक - पिंपरी चिंचवड मनपा )
★ महाराष्ट्राला आहे वीरांचा  इतिहास
सुसंस्कृत इतिहास घडवने हाच आमुचा ध्यास
धरू आम्ही विकासाची कास
करू आम्ही महाराष्ट्राचा विकास
श्री .परशराम लडकत विषय शिक्षक रायगड
★भीमा,कृष्णा,गोदावरी अन् उत्तुंग सह्यगिरी
महाराष्ट्राची राजधानी,माझी मुंबई नगरी
शिवबाचा पोवाडा गर्जतो डफाच्या थापेवरी
नेसून नऊवारी लावणी जगात नेऊया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★मायमराठी आहे लाखात एक
तिच्या भावछटा अनेक
रसाळ मधाळ वाणी प्रत्येक
शब्दमाधुर्याने तिला फुलवू सारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
शिक्षिका
★संताचे चंदन माय मराठी कस्तुरीसम
संस्कृति  शिवबाची  हिंदवी ललकार
सम्रद्धि  गडकिल्यांची शूरवीरांचा झंकार
महाराष्ट्र आपुला किर्तीवंत तोफेचा अलंकार

भावना  चौधरी - कोकाटे
 उस्मानाबाद
★: स्वायत्तेसाठी महाराष्ट्राच्या झुंजले किती वीर
भाषेवार प्रांतरचनेचे घेऊनी कैवार
मुंबई आमची हवी राजधानी म्हणती सारे
उद्योग, शिक्षण, कला संस्कृति मिरवूया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

सुनिता जयराम घुले
अहमदनगर
★ नद्या ,डोंगर,पर्वत सारे
कोकणचे सौंदर्य पाहू यारे
फळे,फुले,अन् पशू पाखरे
कृषीसंपन्नतेचे वाहती वारे

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★महाराष्ट्रातील संस्कृतीचा
थोर आहे वारसा,
शिवबाच्या शिकवणीने
घडतो महाराष्ट्र माझा..

कवयित्री : सुषमा सांगळे - वनवे.उच्चश्रेणी मुख्याध्यापिका,साहित्यिका
सिंधुदुर्ग
★ महाराष्ट्राची गाथा गातो
जयजयकार करतो,
झेंडा आम्ही फडकवतो
देहभान हरपून जातो..!!

प्रणाली कदम, मुंबई
★: थळ,माळशेज , बोर,
फोंडा, खंबाटकी घाट
जाई फिरुन कोकणी
सांगे महाराष्ट्राचा थाट

- विनोद गादेकर (शिक्षक)
वाशी,(उस्मानाबाद)
★ ज्ञानोबा तुकोबांची अभंगवाणी
सानथोर दंग विठ्ठल नामस्मरणी
अशी माझी मायमराठी सर्वगुणी
किर्ती तिची गाऊ या रे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सुर्य अन् तारे

मोहिनी नितीन शिंदे सोलापूर
★माझ्या महाराष्ट्राच्या मातीची
सांगू किती महती
इथल्याच मातीत
शुरवीर जन्म घेती 

 आरती लटपटे, परभणी
★तांदळाची कोठारे भरली
झाडीतूनी मोतीयाचे परी
डोलतात नारळी कोंकणी
पठारावरी ज्वारी बाजरी/

विजय बिंदोड. पांढरकवडा
★देश आमचा संताचा
बहर कल्पनेचा
महाराष्ट्र पाहण्यास वर्दळ
वास्तवास येई बळ

सुरज अंगुले
पत्रकार,साहित्यिक जिल्हा अध्यक्ष,उस्मानाबाद
★फुले,शाहू,आंबेडकर। महाराष्ट्राचे शिल्पकार।।
सनातनी समाजावर। विचारांनी केला प्रहार ।।
संजय गायकवाड(शिक्षक)जळगाव
★महाराष्ट्राच्या पावन भूमीत
माजवला ज्यांनी हाहाकार।
परत मिळवण्या वैभव जुने
महाकाव्यातूनी दया ललकार॥
          माईबाप- चंद्रपूर
★पवित्र या भूवर जन्मली जिजाऊ.
सावित्रीने घातला स्रीशिक्षणाचा पाया.
झाशीवाली रणरागिणी झुंजली
रणरागिणींनी पावन महाराष्ट्र माझा रे.
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र अन् तारे.


कुसूम चौधरी
प्राथमिक शिक्षिका जि. प. शाळा विखरण
जि. धुळे.
★कडे कापरितही ऐकू येते
शौर्याचे महागान
शिवरायांच्या पराक्रमाएव्हढा सवित्रीलाही मान,
अजिंक्य हा सह्याद्री आहे महाराष्ट्राची शान
वर्षा जाधव(शिक्षक)पुणे
★महाराष्ट्र हा देव असे माझा       
   महाराष्ट्र हा प्राण असे माझा   
  स्वाभिमान असे माझा 
माझ्या मातीचा आणि या धरेचा
★धन्य ज्योतिबा सावित्री
युगायुगाचे प्रकाश यात्री
शिक्षणाची वाहे गंगोत्री
क्रांती घडवीली तीमहान स्त्री

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★ओव्या ,अभंग,भारूड,भुपाळी
गोंधळीगीत अन जोगवा गीते
यांच्या नादाने महाराष्ट्र  दुमदमला
महाराष्ट्रात समृद्ध असे हे लोकगीते.

सौ.मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर
जि.प.शिक्षिका (ता. तुळजापूर)

★माझा महाराष्ट् आहे  महान,
इथे न मोठा ना कोणी लहान,
 बाबासाहेबांनी लििहले  संविधान,
कायदे सा-यांना आहे समान.
नंदा परदेशी- धुळे.
★ निर्मळ इथलं पाणी
 पाटानं धावे रानी
सौख्याची आस मनी
बळीराजा गातो गाणी.
सौ. छाया गायकवाड,मुख्याध्यापिका(पुणे)
★संतांची पावन भूमी
माझ्या महाराष्ट्राची
वर्णावी महती सर्वांनी
नेहमीच माय मराठीची

संध्याराणी कोल्हे
(शिक्षिका)
जि.औरंगाबाद
★इतिहास आहे साक्षीला;
शिवबाच्या स्वराज्याला

लढले सवंगडी
छेदले ह्रदय दगडी

सलाम जिजाऊला
शिवबा असे जिचा
   पुञ!

     श्रीमती-कुळधरण एस. एस.
★सांडिले रक्त ज्यांनी महाराष्ट्रासाठी! जिजाऊने पुत्र अर्पण केला ज्या भूमीसाठी!
अशा या महाराष्ट्र भूमीचा आशिर्वाद घ्यावा भावी पिढीसाठी!
हंडाल सुनंदा (शिक्षिका) अहमदनगर
★कडेकपारी नाद ऐकू दे
 न्याय, समता,स्वातंत्र्याचाI
 महाराष्ट्राच्या कणाकणातून
 फुलवू मळा मंगल मैत्रीचा॥
              धनराज गेडाम-चंद्रपूर
★इथे जन्मल्या थोर विभूती
भक्ती, शक्ती जोड संगती
पिढीजात ही गाऊ महती
महाराष्ट्राची उन्नत किर्ती
विजय सातपुते. साहित्यिक, पुणे.
★कोणी ना इथे लहान मोठा
खुल्या साऱ्यांना प्रगतीच्या वाटा
महाराष्ट्राच्या मातीत खजिना साठा
जगाच्या पाठीवर मिळणार ना रे।।
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे।।

काव्यरचना - शिला अम्भुरे बिनगे
   परतुर जालना
★: महाराष्ट्र दिनी जगात घुमू लागले वारे
एक दिलाने लहानथोर नाचू गाऊ सारे
मराठमोळी संस्कृती,आम्हा थिटे नभ सारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★माह्या मराठीच आज महाकाव्य हेहोणार
आज समुहात आम्ही सर्व हे दिव्यकरनार .
आण बाण शान आज सर्वच लिहिनार. 
आणि अजरामर हे काव्य होनार.


श्रीमती अरूणा  उदावन्त
जलगाव.
★महाराष्ट्राचा बळीराजा
पिकवतोय मातीतूनी सोनं
हिरवं शिवार डुलतया
हेच आमुचं सौभाग्यलेणं

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★ चौसष्ट कलेचा महाराष्ट्राने
केला असेही आधारु,
काय गा म्या पामराने या
मातीचे गुण वर्णन करु.

अजित जाधव
सातारा
★महाराष्ट्राचे वैभव देखले
डोंगर,दऱ्या,नदी,नाले
थोर संत होऊनी गेले
नाव तयांचे पावन झाले.
सौ.छाया गायकवाड - मुख्याध्यापिका(पुणे)
★महाराष्ट्र नवरी नटते
अलंकारे नथनी पैठणी
नववारी घालूनी लाजते
गरसोळी पाटल्या लेऊनी/

विजय बिंदोड..पांढरकवडा
यवतमाळ
★मोठ्यांचा मान
कर्तव्याची जाण
माझा महाराष्ट्र आहे
संस्कृतीची खाण

जया जोगदंड(लेखिका) परभणी
★शिवरायांनी निर्मीले
मावळ्यांसह स्वराज्य येथे
सावित्रीने पेटविली
शिक्षणाची ज्योत येथे

संध्याराणी कोल्हे
(शिक्षिका)
जि.औरंगाबाद
★ संतांच्या  पवित्र  भूमित अभंग , मराठमोळ्या  शिवरायांचा  बाण ,
झुणका भाकरीचा ठेचा अन नवैद्य  खीर पुरणपोळी !
   साहित्यीकांची  मांदियाळी , सण , उत्सव , जत्रोत्सव ,
कुस्ती आखाडे ,कबड्डी ,मल्लांचे  रणमैदानी  पराक्रमाची  गाथा !
   माणुसकीचे  अभंग  नाते , मानवतेचे  पुजारी ,
इतिहासाची  शूर  गाथा , गाऊ  किती  गुणगानरे !

सौ . सुनंदा  नरेंद्र  चौधरी .
वसई  , पालघर .
★माझ्या महाराष्ट्राची पवित्र माती.
संत महात्म्याच्या स्पर्शाने पावन.
माणुसकीचे घडते दर्शन पदोपदी.
परस्री आम्ही मानतो मातेसमान रे.
जयगाण गाती महाराष्टाचे नभी सूर्य चंद्र अन् तारे.

कुसूम चौधरी
प्राथमिक शिक्षिका
जि. प. शाळा विखरण देवाचे
 जि.धुळे
★राष्ट्राचे करण्या रक्षण,
महाराष्ट्र सदैव धावतो...,
शौर्य अन संस्कृतीचा,
निर्मळ प्रवाह वाहतो..!
श्री बाळासाहेब शिंगोटे
अध्यक्ष,व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र(पारनेर,अहमदनगर)
★खुरपं ,कोयता,नांगर
   सांभाळितो  शेतावर
काळयाआईची लेकरं
   काबाडकष्ट सालभर

गोरे शामल तुकाराम  शिक्षिका लातूर
★महाराष्ट्राची भाषा असे मर्हाटमोळी
अमृतासवे वाटे तिची गोडी
देशादेशाला भुरळ तिने घातली
अशी मराठी आमची मायबोली

रोहिणी गायकवाड सटाणा नाशिक
★आई तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभला
शिव शंभुच्या पराक्रमाने सह्याद्री गर्जला
महाराष्ट्रात नांदती अनेक जाती धर्माचे लोक
आनंदाने गाऊनी म्हणती आम्ही सगळे एक
 कुलथे जया जगन्नाथ(शिक्षिका)
     अहमदनगर
★बारा महिनेचे बारा सण
आनंदे आणते,
सण समरांभातून माझी
संस्कृती दावते.

अजित जाधव
सातारा
★नटलेल्या या समूहाकडे
मन माझे घेते ओढ
साहित्य वाचनाची आवड
संस्कृती आमची गोड

सुरज अंगुले,उस्मानाबाद
पत्रकार
★वैविध्याने सजला असला
महाराष्ट्र समृद्ध आमचा
दुमदुमे गर्वाने अंबरी
जयघोष हा महाराष्ट्राचा /

विजय बिंदोड...पांढरकवडा
यवतमाळ..
★संत महंताना मान  ।
छत्रपतीचे गुणगान।
थोरा मोठ्याचा सन्मान।
हीच महाराष्ट्राची शान ।

    मधुश्री ओव्हाळ. ( इन्चार्ज) पुणे.
★ऊस हळद इथल्या
शिवारी नहाते,
जगाच्या बाजारी
काळ्यामाईचे गुण गाते.

अजित जाधव
सातारा
★विभिन्न वेषभूषा, अन भाषा ,
विभिन्न इथल्या जाती.
ईद, नाताळ, होळी, दिवाळी,
सगळेच साजरा करती.
इथल्या संस्कृतीचे नारे 
जगी साऱ्या घुमवारे ।।
जयगान गाती महाराष्ट्राचे
नभी सूर्य अन तारे ।
( सौ. ऊर्मिला भोजने, उपशिक्षिका, चांदवड, नाशिक)
★महाराष्ट्र भुमी आहे पराक्रमाची
इथे कमी नाही शुर विरांची
शुर विरांच्या त्यागातुन घडला महाराष्ट्र
अभिमानी आहे मी माझे राज्य आहे महाराष्ट्र
कुलथे जया जगन्नाथ(शिक्षिका)
 अहमदनगर
★सामुहिक महाकाव्य निर्मीतीत
माझा खारीचा वाटा
महाराष्ट्राची शान नेहमीच
मनामनात सर्वांनी थाटा

संध्याराणी कोल्हे
(शिक्षिका)
जि.औरंगाबाद
★महाराष्ट्र माझा कला, साहित्य, इतिहासाची कथा ।
शिवरायांच्या शौर्या पुढे नतमस्तक होतो  माथा ।
वेरूळचे घृष्णेश्वर सांगे भोसल्यांची  वीरगाथा ।
फुले ,शाहू , आंबेडकरांच्या वारसेत महाराष्ट्राचा उंचावू माथा।

सेो.दुधमल vk/ (बगाटेvs)शिक्षिका, हिंगोली
★संतांचे  अभंग अन  मराठमोळ्या  शिवरायांचा  बाणा .
झुणका ठेचा भाकरी अन  नवैद्याला  खीर पुरणपोळी .
साहित्यीकांची मांदियाळी अन  कुस्ती आखाडा , मल्लांचा रणमैदानी  पराक्रमी  गाथा .
माणूसकीचे अभंग नाते अन  इतिहासाचे  किती गाऊ  गुणगानरे .

सौ . सुनंदा  नरेंद्र  चौधरी .
वसई   .  पालघर
★सह्याद्रीच्या डोंगररांगा
समुद्राच्या लाटा खळाळतो,
शौर्य गान गावी महाराष्ट्राची
अंगात बळ सळसळतो..!!

प्रणाली कदम, मुंबई
★महाराष्ट्राची मायबोली
मराठी आमची शान,
विभिन्न संस्कृती दर्शन
घडवणारी ती अनमोल खाण.....
प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका, अहमदनगर.
★महाराष्ट्र माझा देशात महान।
शुरवीर नगरीत शिवबांचे  प्रेरणास्थान।
फुले, शाहू, आंबेडकर, शिवा  तिरंग्याची जान।
 नतमस्तक होऊन उंचऊ महाराष्ट्राची शान ।

सेो.दुधमल विजया(बगाटे).शिक्षिका हिंगोली
★पाठपुजा  भूपाळी  अरूणोदय होता
सुख-शांति समृद्धि  येते घरोघरी
हमखास मेजवानी अतिथि देवो भव
माणूसकिचा महाराष्ट्रीयन गळा दारोदारी

भावना  चौधरी - कोकाटे
उस्मानाबाद
★महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे पंढरपुरी
आषाढ़ी एकादशिला दुमदुमते पंढरी
दिंडीत रम्य होतो भक्त भाविकांचा मेळा
विठूरायला साकडे घालन्यास पंढरी होतो गोळा
कुलथे जया जगन्नाथ(शिक्षिका)
     अहमदनगर
★महाराष्ट्राच्या मातीचा या आहे सुरेख गंध
आनंदाने आम्ही होतो
त्याच्या रुढीपरंपरेत दंग
 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★महाराष्ट्राच्या मातीचा
 या आहे सुरेख गंध
आनंदाने आम्ही होतो
त्याच्या रुढीपरंपरेत दंग

 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★महाराष्ट्र माझा नवरत्नांची खाण..
हिंदू,मुस्लिम,शिख,ईसाई गाती स्वातंत्र्याचे जयगान...
धन्य तो शिवबा धन्य ती जिजाऊ
घडविला ज्यांनी महाराष्ट्र महान....
ज्योती म्हस्कुले,उपाध्यापक
सहकारवस्ती.अहमदनगर.
★शञूची नजर झुकवी
अंगी उठले शहारे,
महाराष्ट्राचा तो मान
फडकवू भगवा सारे.....
प्रियंका ढोले/वायकोस, शिक्षिका अहमदनगर.
★रणवीर शुर सरदार
जन्मले याच मातीवर
लढले याच भूमीवर
शत्रु अडविले सिमेवर

गोरे शामल तुकाराम शिक्षिका लातूर
★महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्राला समांतर
सह्यद्रीच्या पर्वतरांगां मध्ये कोकण राजा
पर्वतरांगातून उगम पावतातगोदावरी कृष्णेसह
 नर्मदा शिखरावरुन कळसुबाई पाहते  मजा

सौ.वंदना विश्वास पाटील
महाड -रायगड ,शिक्षिका
★ जय महाराष्ट्र गीत हे आपुले,
साधूसंताचे संस्कार हे लाभले
बहिनाई ,लता रत्न जाहले
सावित्रीने आम्हास जागविले.
जयश्री माणिक पगारे (शिक्षिका )नाशिक
★ मंदिरे कृष्ण पाषाणी, गिरीवरती सुंदर लेणी
लतादिदींची मंजूळ गाणी,संतांची अभंगवाणी
प्रेमळ माया आनंदवनी त्या अनुभवूया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★खो -खो ,कबड्डी,आट्या-पाट्या,
सुरपारंब्या, लगोरी.....
विटी-दांडू ,मल्लविद्या,
घुमे मातीतून ललकारी ...!
श्री बाळासाहेब शिंगोटे
सहशिक्षक, पारनेर,अहमदनगर
★ महाराष्ट्रानेच घडवला
आमचा शिवबा राजा
अन्यायीला वेळीच शिक्षा
जशास तशी सजा

 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★कबीर, भिमराव, फुले
या महाराष्ट्रात जन्मले
किती आले किती गेले
करणीने जगा दिपवले.
सौ.छाया गायकवाड - मुख्याध्यापिका, पुणे.
★प्रगतीच्या वाटेवर चालली
महाराष्ट्राची यशोगाथा,
गुण गाऊ किती राष्ट्राचे
टेकवला सर्वानी येथेच माथा...
प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका,अहमदनगर.
★ महाराष्ट्राचा माझा बळीराजा
राबतोया त्याच्या शिवारी
आनंदाने  डोलतयं पीक
मन घेई आनंदे भरारी

मीनाक्षी काटकर यवतमाळ
★ सत्याशी जडावे
अन्यायाशी लढावे
माझा महाराष्ट्र सांगतो जातीसाठी
नाही मातीसाठी झिजावे

जया जोगदंड(लेखिका) परभणी
★माझ्या महाराष्ट्राच्या परंपरेला
प्रत्येक सुगरणीचाच वारसा
पुरणपोळी असो वा तांबडा रस्सा
मर्जीने घ्यावा हवा तस्सा....
      श्रीम. लाहोर आर. बी.
       केंद्र प्रमुख पेंडगाव ता. जि. बीड
★महाराष्ट्रीअसावेवदेचक्रधरस्वामी
 इंग्रजीझालीमाय नि मराठी मामी
सैराटजनता, झिंगाटसरकारनामी
जिवंततारेजपत,ऑनलाइनव्हारे!
जयगान....
लता कोलते पातरीकर
★ महाराष्ट्रानेच घडवले
येथे शिवछञपती
छञपतीनेच दाखवली
येथे भल्याभल्यांना माती


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★रांगडी मराठी लावण्यवती लाजाळु
कोरीव लेणी अजिंठा वेरुळाची
काळी माती श्रमिकांच्या घामाची
विपुल सर्वश्रेष्ठ साहित्यिकांच्या लेखनीची

नालंदा वानखेड़े प्रशा. अधिकारी, नागपुर
★देश हा संतांचा,महंतांची ही कीर्ती
शिवबाचे शूर मावळे,कसली कुणा ना भीती
प्रगतीच्या वाटेवर एकमेकांच्या घेऊ हात हाती,
गौरवगाथा महाराष्ट्राची मिळुनी गाऊ सारे,
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे....


श्रीम- उषा बप्पासाहेब ढेरे
        सह शिक्षिका,
        बीड
★महाराष्ट्रातच जन्मला
शिवबाचा तो मावळा
पंढरीत तो बसला माझा
विठूराया सावळा


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★राकट देशा कणखर देशा
मजबुत माझ्या महाराष्ट्र देशा
संताच्या पदस्पर्शाने पावन अशा
शिवरायांच्या गडकिल्यांच्या देशा

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
★वर्णावा  महिमा तितुका कमी
या  महाराष्ट्रीयन  मातेला
पून्हा  पून्हा मी व्याकुळ होते
गुणगान  गाण्याच्या  भूकेला

भावना  चौधरी  - कोकाटे
 उस्मानाबाद
★: सह्याद्रीचा मुकूट शोभतो याच्या डोईवरती,
हिरवा शालू घालून नटली पहा ही धरती,
भिमा,क्रुष्णा आणि कोयना संथगती वाहती,
महाराष्ट्राची गाऊ कौतूके सर्व देवूया नारे!!
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे ।

रुपाली काळे -घोरे(शिक्षिका)पातूर.अकोला.
★राकट हा देश आहे पवित्र इथली माती
गुण्यागोविंदाने नांदती अठरापगड जाती
कृषिप्रधान देश ही तर आमची ख्याती
विकासाचे जयगाण घुमवी दिशादिशातून नगारे
जयगाण गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे !!

       शैलजा ओव्हाळ/चिलवंत
                   बीड
★जात्यावरची ओवी गाते बहिणाबाई
ज्ञानदेवाची ताटी उघडते मुक्ताबाई
विठूराया चरणी लीन होते जनाबाई
स्त्री पूज्य सावित्रीची ओवी गाऊया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे


मनिषा शेजोळे ( मुख्याध्यापिका ) - अकोला
★महाराष्ट्राच्या आरतीसाठी
आणिन तारे चंद्र
महाराष्ट्राचे वैभव पाहून
लाजेलही स्वर्गिचा इंद्र


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★माझ्या महाराष्ट्राचा
अटकेपार गेला झेंडा
अर्थ नीतीमान राजा
जिजाऊचा शिवबा गुंडा

  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो निनाद
अनेकतेत एक तू यात नाही विवाद
महाराष्ट्र माझा साधे प्रत्येकाशी संवाद
युपी, यमपी, अवघ्यांचे तव चरणी वाहते वारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

उषा सचिन खोपडे
महाड जिल्हा_रायगड
मुख्याध्यापक, कवी, लेखक
★माझ्या महाराष्ट्रात विविध जाती पंथ
पवित्र करुनी गेले थोर संत महंत
वेषभुषेच्या संस्कृतीतही वैविध्य पुरे
महाराष्ट्रा सामावुनी घेई कोणी न ऊरे!...

कडे कपारी.....अन् तारे

सौ.रोहिणी अशोक गंधेवार
(कवीयत्री...)अकोला
★भगवा फडकला गगणी
केले केसरी क्षितीज
ताकद याच्यात शिवबाची
नमले इथे बलाढ्य गज

सौ.अलका आ.धनकर(शिक्षिका)
वाशिम.
★जय जय महाराष्ट्र माझा
म्हणून गाऊया गुणगान
आलेच संकट त्याच्यावर जर
तर देऊया बलीदान


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★दऱ्याखोऱ्यातुनी , गिरीशिखरावरती ,
    पराक्रमाचे  घुमू  लागले  नगारे  !
विभिन्न  भाषा  नि  वेशभूषा , अनेक पंथ
     वाजू  लागले संस्कृतीचे  नगारे !
★  आध्यात्मिकता , रुढी अन  परंपरा .
   संत महंतांची  कीर्तीरुपी  गुढी  उभारे !
गौरवगान  महाराष्ट्राचे  अभिमानाने  गाऊ  सारे ,
जयगान  गाती  महाराष्ट्राचे नभी  अनोखे  सूर्य  अन  तारे - - - - -

सौ . सुनंदा  नरेंद्र  चौधरी
वसई  . पालघर
★चांदा ते बांदा महाराष्ट्र माझा                             भीती न आम्हा सह्याद्रिच्या पुञा                       छञपती,फुले,शाहू,भिमाईच्या भिवा                   सर्वधर्म समभाव जपतो महाराष्ट्र माझा               कमलाकर मेश्राम शिक्षक भद्रावती चंद्रपूर
★महाराष्ट्राची शेती उदरनिर्वाहाची जननी
घाम गाळूनिया पिकवी पिक पानी
माझा महाराष्ट्र म्हणजे शेतीची खाण
कष्ट करूनी पिकवी सोन्याचे रान
कुलथे जया जगन्नाथ(शिक्षिका)
   अहमदनगर
★माझ्या महाराष्ट्राचे हो
रूप बोलीभाषेन नटलं
कानाकोपऱ्या जगात
तिनं दुकान थाटलं
  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★महाराष्ट्राच्या भुमीत जन्मले शाहू ,फुले,आंबेडकर
शाहू महाराजांनी पहिले  पद केले गीरदावार
फुल्यांनी शाळा काढून शिकविले पोर
आंबेडकर साहेबांनी घटना लिहून केले उपकार ..

शिवाजी नामपल्ले  मा.शिक्षक
अहमदपूर जि.लातूर
★शूर-वीरांची नररत्नांची खाण 
इथे जन्मले मुत्सद्दी विद्वान
दिशातुनी घुमते तुझे गाण
महाराष्ट्र महान हाच अभिमान

सौ.वासंती अनिल कोदांडे (शिक्षिका)
        सांगली
★महाराष्ट्र माझा नांदो
येथे एकोपा
घडो देशात नंबर
एक सलोखा
भारती सैंदाणे - जळगाव
★महाराष्ट्राच्या परंपरेचा
पुढे चालवू वारसा
मी मराठी मी मराठी
मनी उमठला ठसा


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★महाराष्ट्राचा जन्मदिवस आज
त्याला उपस्थिती कवी,कवयत्रीची
आणला केक काव्याचा
शुभेच्छा देती महती त्या शब्दाची

सुरज अंगुले उस्मानाबाद
पत्रकार
★इतिहास उत्तुंग शतकांचा लाभला तुला
परि अभंग, अविट अवतार पुन्हा लाभला
१मे १९६० ला जन्म तुझा रे झाला
तुझ वाढदिनाच्या शुभेच्छा देतो शतदा रे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य चंद्र तारे

उषा सचिन खोपडे
महाड जिल्हा_रायगड
मुख्याध्यापक, कवी, लेखक
★ या भुमीला छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा वारसा
संतांनी दिला दया परोपकाराचा वसा
शाहु फुले आंबावडेकरांनी नांदवली समता गावकुसा
त्यांच्या कार्याची धुरा झेलु या रे

रोहिणी गायकवाड सटाणा नाशिक
★ जाहले रणयुद्ध महाराष्ट्र भू -साठी
कुणी भाला ,समशेर घेऊन हाती
छातीत झेलून वार आम्ही
माथी टिळक लावली पवित्र माती

सौ.अलका आ.धनकर
शिक्षिका
ता.जि.वाशिम
★जगप्रसिध्द लेण्या अन् जोर्तिलिंगाचे स्थान,
देवताला ही आवडलेली
महाराष्ट्राची भूमी महान...

प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
★महाराष्ट्र माझा संत ,लढवय्ये शास्त्रज्ञांचा
महिमा गाजला जगी हो  तयांचा
ज्याचा मनी आमच्या ठसा आहे हो कायमचा
चला करू या जयजयकार ,आपल्या महाराष्ट्राचा.
स्मिता लहू नवघरे.(शिक्षिका)
     महाड ,रायगड
★महाराष्ट्राच्या लोककला, आहेच मुळी भारी
लावणी,पोवाडा,गवळण,गोंधळाची ऐटच न्यारी
श्रवण करूनि होती तल्लीन , विश्वमंडळे सारी
संस्कृती लोककलेची, जतन करू या रे
जयगान गाती
महाराष्ट्राचे,नभी सूर्य अन तारे

शालिनी रोहित मेखा(संगीत शिक्षिका)
मुंबई
★माझ्या महाराष्ट्राची माती
धान्यमोत्याची  हो खाण
भरभरून उधळिते
संस्कृतीचे हरेक वाण

  संगीता भंडे
सहा.शिक्षिका
मुंबई
★माझ्या महाराष्ट्राच्या भूमीत रे
पिकांसह माणसं अंकुरतात
संतांपासून सैनिकांपर्यत
रोजच नव्याने मानाचेतुरे रोवतात.
     श्रीम. लाहोर आर. बी. कें. प्र. पेंडगाव  बीड.
★जय जयकार महाराष्ट्राचा,
करते मी आज,
विविधतेने नटलेल्या परंपरेचा,
चढवला हा साज.


धनश्री गांगुर्डे,नाशिक
★सह्याद्रीचा कडा गर्जतो
जय शंभू राजा
मनामनात एकच नाद
महाराष्ट्र माझा


 उदमले राजू लक्ष्मण
मुख्याध्यापक
अहमदनगर
★★★★★
संकलनःसौ.मनीषा कुलकर्णी-अपसिंगकर

No comments:

Post a Comment